लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वन कोठडीतून पसार झालेल्या महादेव उईके याच्या मृतदेहाचे रविवारी मेडिकलमध्ये ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येत उपस्थित असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांसह जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह यादव यांनी वन अधिकाºयांच्या विरोधात नारेबाजी केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.वाघाच्या अवशेष चोरीप्रकरणात अटक करण्यात आलेल्या महादेव उईकेला रामटेक तालुक्यातील सिल्लारी येथील पेंच प्रकल्पाच्या वन कोठडीत ठेवण्यात आले होते. हा आरोपी या वन कोठडीतून पळून गेला होता. नऊ दिवसानंतर त्याचा मृतदेह पारशिवनी तालुक्यातील ढवलापूर शिवारात शनिवारी दुपारी आढळून आल्याने खळबळ उडाली. उईकेचा मृत्यू संशयास्पद असून, घातपाताची शक्यता त्याच्या कुटुंबीयांसह नागरिकांनी व्यक्त केली. जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह यादव यांनी हे प्रकरण उचलून धरत पारशिवनी पोलीस ठाण्यात एसीएफ गीता नन्नावरे, पवनी बफर झोनचे आरएफओ पांडुरंग पाकळे, नागलवाडीचे आरएफओ नीलेश गावंडे यांच्या विरोधात तक्रार नोंदविली; शिवाय या अधिकाºयांना अटक करण्याची मागणी यादव यांनी केली. मेडिकलमध्ये रविवारी शवविच्छेदनाला सुरुवात होण्यापूर्वी यादव व मृताच्या कुटुंबीयांनी वन अधिकाºयांच्या विरोधात नारेबाजी केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शवविच्छेदनाचे व्हिडीओ शुटिंग करण्यात आले.भुकेने मृत्यू झाला असावासूत्राने दिलेल्या माहितीनुसार, उईके याच्या मृतदेहावर जखमा नव्हत्या किंवा कुठल्या हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याच्या खुणा नव्हत्या. सलग आठ-नऊ दिवस तो जंगलात भटकत असल्याने भुकेने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज काढण्यात येत आहे. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातही विशेष असे काही आढळून आले नसल्याची माहिती आहे.
उईकेच्या मृतदेहाचे ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 1:29 AM
वन कोठडीतून पसार झालेल्या महादेव उईके याच्या मृतदेहाचे रविवारी मेडिकलमध्ये ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्यात आले.
ठळक मुद्देमेडिकल : वन अधिकाºयाच्या विरोधात नारेबाजी