नागपूर : ग्रीन व्हिजिल या पर्यावरण संस्थेच्यावतीने सोमवारी जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त फुटाळा चौपाटी येथे विशेष अभियान राबविण्यात आले. या अभियानातंर्गत संस्थेच्या सदस्यांनी नागरिकांना पर्यावरण व निसर्गाचे महत्त्व पटवून दिले. तसेच निसर्ग संरक्षण व संवर्धनाचा संदेश दिला. वाढत्या प्रदूषणामुळे निसर्ग संकटात सापडला आहे. त्याचा वातावरणावर वाईट परिणाम होत असून नैसर्गिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे प्रत्येकाने निसर्ग व पर्यावरणाचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. संस्थेचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी म्हणाले, भविष्यातील पिढीसाठी नैसर्गिक संपदा जतन करून ठेवणे आवश्यक झाले आहे, अन्यथा नव्या पिढीला फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. या अभियानात दक्षा बोरकर, सुरभी जैस्वाल, नजमा खान, राहुल राठोड, कुमारेश टिकादार, सुभम येरखेडे, शीतल चौधरी व दादाराव मोहोड यांनी भाग घेतला होता.मोकाट कुत्र्यांचा धुमाकुळनागपूर : हिंगणा मार्गावरील गाडगेनगर भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळात झाला आहे. रात्री पादचारी व दुचाकीधारकांच्या अंगावर ही कुत्री धावत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
निसर्ग संवर्धन दिनानिमित्त अभियान
By admin | Published: July 29, 2014 12:50 AM