शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
3
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
5
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
7
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
8
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
9
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
10
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
11
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
12
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
13
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
14
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
15
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
16
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
17
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
18
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
19
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
20
सोलापुरात मतदान केंद्रात प्रथमोपचार किट; रुग्णवाहिका अन् डॉक्टरही तैनात

‘कॅन्सरला कॅन्सल करा’ आज नागपुरात

By admin | Published: April 26, 2017 1:33 AM

‘कॅन्सरला कॅन्सल करा’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘लोकमत’ आणि कोकि ळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाने ‘एक जीवन स्वस्थ जीवन’

लोकमत व कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाचा संयुक्त उपक्रम नागपूर : ‘कॅन्सरला कॅन्सल करा’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘लोकमत’ आणि कोकि ळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाने ‘एक जीवन स्वस्थ जीवन’ हा दहा दिवसांचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभरात विविध कार्यक्रमांद्वारे कर्करोगाबाबत जागृती करण्यात येत आहे. त्यापैकी नागपुरातील वर्धा रोडवरील हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे २६ एप्रिल रोजी, सकाळी १० वाजता तज्ज्ञ डॉक्टरांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलच्या अध्यक्ष टीना अंबानी, प्रसिद्ध सिने अभिनेता इमरान हाश्मी व लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेचे सहकार्य मिळाले आहे. या परिसंवादात डॉक्टर्स, फिजिशियन्स, वैद्यकीय समुपदेशक, समाजसेवक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कर्करोगावर मात करून नवीन आयुष्य सुरू करणारे अनेकजण या वेळी त्यांचे अनुभव उपस्थितांना सांगणार आहेत. या उपक्रमाद्वारे पथनाट्य, परिसंवाद, डॉक्टरांना विशेष प्रशिक्षण असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात नाशिक येथून झाली असून, नागपुरात त्याची सांगता होणार आहे. ‘लोकमत’ आणि कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग व त्यावरील उपचारांबाबत जनजागृती करण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘कॅन्सरला कॅन्सल करा’ आज नागपुरात या माध्यमातून पथनाट्य, सखी मंचचे कार्यक्रम, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि डॉक्टरांना प्रशिक्षण, अशा विविध कार्यक्रमांद्वारे राज्यभरात कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी ९३२२१४४४४४ या क्रमांकावर मिस कॉल द्या किंवा लॉग आॅन करा ‘डब्ल्यूडब्ल्यू डॉट एकजीवनस्वस्थजीवन डॉट ईन’वर. देशात कर्करोग हा सर्वात घातक आजार ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, दरवर्षी भारतात सुमारे १० लाख लोकांना कर्करोगाचे निदान होते. २०३५ पर्यंत ही आकडेवारी १७ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. तरीही या आजाराबाबत लोकांमध्ये अजूनही भरपूर अज्ञान आहे. त्यामुळे बहुतेकदा तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यावर येईपर्यंत कर्करोगाचे निदान होत नाही आणि या टप्प्यावर त्यावर उपचार करणे अतिशय कठीण होऊन जाते. वस्तुत: लवकर निदान झाल्यास, हा आजार बरा होण्याची शक्यता अधिक असते आणि त्यासाठी या रोगाबद्दल जागरूकता असणे महत्त्वाचे ठरते. -परिसंवादात सहभागी तज्ज्ञ डॉक्टर्स : नागपूर आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल : कोकिळाबेन रुग्णालयाचे कन्सलटंट ब्रेस्ट अ‍ॅण्ड कोलोरॅक्टल आॅन्कॉलॉजी विशेषज्ञ डॉ. मंदार नाडकर्णी : कोकिळाबेन रुग्णालयाच्या आॅन्कॉलॉजीचे संचालक डॉ. राजेश मिस्त्री. : कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा : आयएमए नागपूरच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत : स्नेहांचल पॅलिअ‍ॅटीव्ह केअर सेंटरच्या अध्यक्ष डॉ. रोहिणी पाटील : सायको आॅन्कॉलॉजिस्ट एचसीजी एनसीएचआरआय कॅन्सर सेंटरच्या डॉ. सुचित्रा मेहता : राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचे सहसंचालक डॉ. बी.के. शर्मा या माध्यमातून पथनाट्य, सखी मंचचे कार्यक्रम, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि डॉक्टरांना प्रशिक्षण, अशा विविध कार्यक्रमांद्वारे राज्यभरात कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी ९३२२१४४४४४ या क्रमांकावर मिस कॉल द्या किंवा लॉग आॅन करा ‘डब्ल्यूडब्ल्यू डॉट एकजीवनस्वस्थजीवन डॉट ईन’वर. देशात कर्करोग हा सर्वात घातक आजार ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, दरवर्षी भारतात सुमारे १० लाख लोकांना कर्करोगाचे निदान होते. २०३५ पर्यंत ही आकडेवारी १७ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. तरीही या आजाराबाबत लोकांमध्ये अजूनही भरपूर अज्ञान आहे. त्यामुळे बहुतेकदा तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यावर येईपर्यंत कर्करोगाचे निदान होत नाही आणि या टप्प्यावर त्यावर उपचार करणे अतिशय कठीण होऊन जाते. वस्तुत: लवकर निदान झाल्यास, हा आजार बरा होण्याची शक्यता अधिक असते आणि त्यासाठी या रोगाबद्दल जागरूकता असणे महत्त्वाचे ठरते. (प्रतिनिधी)