शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

आदिवासींना उद्ध्वस्त करणारे कायदे रद्द करा

By admin | Published: July 24, 2016 2:12 AM

या देशातील आदिवासींना अस्मानी संकटापेक्षा सुल्तानी संकटाने अधिक छळले आहे. त्यामुळे त्यांच्या पिढ्यान्पिढ्या उद्ध्वस्त करणारे सरकारी कायदे

केंद्रीय मंत्री गडकरी यांचे परखड प्रतिपादन : रवींद्र कोल्हे व स्मिता कोल्हे यांना ‘डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार’ प्रदान नागपूर : या देशातील आदिवासींना अस्मानी संकटापेक्षा सुल्तानी संकटाने अधिक छळले आहे. त्यामुळे त्यांच्या पिढ्यान्पिढ्या उद्ध्वस्त करणारे सरकारी कायदे जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत त्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार नाही, असे परखड आणि अंतर्मुख करणारे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले. सी. मो. झाडे फाऊंडेशनच्या सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्राच्यावतीने शनिवारी ‘डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार-२०१६’ वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. शंकरनगर चौकातील साई सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. अतिथी म्हणून मंचावर राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, सामाजिक कार्यकर्त्या रूपाताई कुलकर्णी, सर्वोदयी विचारवंत अ‍ॅड़ मा. म. गडकरी, सी. मो. झाडे फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास झाडे व सत्कारमूर्ती डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात ही शारदास्तवनाने करण्यात आली. गडकरी पुढे म्हणाले, जंगल आणि पर्यावरण टिकलेच पाहिजे. त्यासाठी कायदेही हवेच. मात्र ते कुणासाठी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून आजही अनेक आदिवासी भागात रस्ते नाहीत, पाणी नाही, वीज नाही, असे सांगितले. शिवाय यामुळे आदिवासींमध्ये प्रचंड आक्रोश असून, यातूनच नक्षलवादासारखी प्रवृत्ती पुढे येत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या सर्व सामाजिक व आर्थिक मागासलेल्या लोकांचे जीवन सुसह्य करण्याची गरज आहे. यासाठी आदिवासी भागात उद्योग उभे झाले पाहिजे. वनांवर आधारित रोजगारनिर्मितीतून सामाजिक परिवर्तन झाले पाहिजे, असाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. सोबतच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मेळघाटातील रस्ते बांधकामादरम्यान त्यांना आलेले कटू अनुभव यावेळी त्यांनी सांगितले. रामटेक क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांनी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरपाठोपाठ आता संपूर्ण राज्य दारूमुक्त करावे, अशी मागणी केली. कार्यक्रमाचे संचालन स्वाती खुद्दार यांनी केले. सी. मो. झाडे फाऊंडेशनचे विश्वस्त नारायण समर्थ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) गडकरींची जनसुनावणी सत्कारमूर्ती तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे या दाम्पत्याचा सत्कार करण्याच्या औपचारिकता पलीकडे जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या प्रश्नाबाबत कृतिशील संवेदनशीलता दाखविली. विशेष म्हणजे, नुकत्याच काही दिवसांपूर्वी डॉ. कोल्हे दाम्पत्याकडील बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी मेटॅडोरमध्ये भरून चोरून नेल्याची व्यथा त्यांनी शनिवारी गडकरी यांच्यासमोर मांडली. त्यावर गडकरी यांनी लगेच अमरावतीचे पोलीस अधीक्षक यांना दूरध्वनी करून घटना सांगितली, तसेच तातडीने आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या. शिवाय विद्युत कमी दाबामुळे मेळघाटातील अनेक गावांपर्यंत अजूनही वीज पोहोचली नाही, असेही कोल्हे दाम्पत्याने यावेळी गडकरी यांना सांगितले. त्यावरही गडकरी यांनी तत्काळ मंचावरूनच राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दूरध्वनीवरून विषयाची माहिती दिली. त्याच वेळी बावनकुळे यांनीसुद्धा संवेदनशीलता व तत्परता दाखवून लगेच कार्यक्रमस्थळ गाठले आणि मेळघाटातील आदिवासींच्या विजेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे त्यांनी आश्वासन दिले. डॉ. कोल्हे दाम्पत्याचा गौरव कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे या दाम्पत्याला ‘डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार-२०१६’ प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. एक लाख रुपयांचा धनादेश, शाल-श्रीफळ व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सोबतच यावेळी वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित शहरातील उद्योजक तथा सोलर इंडस्ट्रिज इंडिया लि.चे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जीवाला धोका यावेळी राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हात दारूबंदी केल्यामुळे आपल्याला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. तसेच राजकारणातून संपविण्याचा जोरदार प्रयत्न झाल्याचे जाहीरपणे सांगितले. सोबतच ते म्हणाले, आज समाज ‘सेल्फी’ काढता काढता ‘सेल्फीश’ व्हायला लागला आहे. यात समाज हा व्यसनमुक्त करण्याची जबाबदारी ही सरकारऐवजी स्वत: समाजाने स्वीकारावी, असे त्यांनी आवाहन केले. तसेच डॉ. कोल्हे दाम्पत्यासारख्या विचारांचे चांगले लोक गावागावात तयार झाले पाहिजे, अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. मेळघाट बदलत आहे यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. रवींद्र कोल्हे यांनी मागील १५ वर्षांत मेळघाट बरेच बदलले आहे. कुपोषण कमी होत आहे, असे सांगितले. मात्र सोबतच अजूनही येथील २५० गावे मोबाईल नेटवर्कच्या बाहेर आहेत. त्यामुळे येथील लोकांना मरणाच्या दारातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्यापर्यंत सोयीसुविधा पोहोचव्या लागतील, असे ते म्हणाले. डॉ. स्मिता कोल्हे यांनी डॉक्टर म्हणून आदिवासींमध्ये काम करताना आलेले अनुभव यावेळी कथन केले. त्या म्हणाल्या, एका वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका आदिवासी व्यक्तीवर २०० टाके मारून आपली डॉक्टरी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर अनेक आदिवासींचे प्राण वाचविल्याचाही त्यांनी उल्लेख केला