मेकोसाबाग-सीएमपीडीआय उड्डाणपूल रद्द करा; सार्वजनिक बांधकाम विभागाला मागणी

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: April 5, 2023 06:36 PM2023-04-05T18:36:27+5:302023-04-05T18:36:53+5:30

Nagpur News मेकोसाबाग ते सेंट्रल माईन प्लॅनिंग ॲण्ड डिजाईन इन्स्टिट्यूट (सीएमपीडीआय) उड्डाणपूल रद्द करा, अशी मागणी जनहित याचिकाकर्ते रमेश वानखेडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंत्यांना केली आहे.

Cancel the Mecosabagh-CMPDI flyover; Demand to Public Works Department | मेकोसाबाग-सीएमपीडीआय उड्डाणपूल रद्द करा; सार्वजनिक बांधकाम विभागाला मागणी

मेकोसाबाग-सीएमपीडीआय उड्डाणपूल रद्द करा; सार्वजनिक बांधकाम विभागाला मागणी

googlenewsNext

राकेश घानोडे
नागपूर : मेकोसाबाग ते सेंट्रल माईन प्लॅनिंग ॲण्ड डिजाईन इन्स्टिट्यूट (सीएमपीडीआय) उड्डाणपूल रद्द करा, अशी मागणी जनहित याचिकाकर्ते रमेश वानखेडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंत्यांना केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला बुधवारी ही माहिती देण्यात आली.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वानखेडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव के. एस. जांगळे, निवृत्त अधीक्षक अभियंता जीवन निकोसे व नगररचनातज्ज्ञ सुजित रोडगे यांच्यासोबत गेल्या साेमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंत्यांची भेट घेतली. दरम्यान, या सर्वांनी मेकोसाबाग-सीएमपीडीआय उड्डानपुल व राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) ते जरीपटका रेल्वे ओव्हर ब्रिजवरील आक्षेप लावून धरले. आधी एनएडीटी-जरीपटका आरओबी प्रकल्पच मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर, एका अज्ञात व्यक्तीच्या दबावाखाली मूळ आराखड्यात बदल करून या प्रकल्पात मेकोसाबाग-सीएमपीडीआय उड्डाणपुलाचा समावेश केला गेला. हे दोन्ही पूल एकमेकांना छेदून चौक निर्माण होणार आहे. पुलावरून वाहने वेगात धावत असल्यामुळे तो चौक अपघाताचे ठिकाण बनू शकतो. करिता, उड्डाणपूल रद्द करण्यात यावा, अशी मागणी मुख्य अभियंत्यांना करण्यात आली.

याशिवाय, एनएडीटी-जरीपटका आरओबीचे जरीपटक्याकडील लँडिंग मागे घेण्यात यावे. पिलर-३ पासून उड्डाणपुलाची उंची कमी केल्यास लँडिंग मागे घेणे शक्य होईल. करिता, आराखड्यात सुधारणा होतपर्यंत जरीपटक्याकडील बांधकाम थांबविण्यात यावे, असेही मुख्य अभियंत्यांना सांगण्यात आले. राज्य सरकारने बुधवारी यावर उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे न्यायालयाने प्रकरणावरील सुनावणी एक आठवडा तहकूब केली. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. शशिभूषण वाहाणे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Cancel the Mecosabagh-CMPDI flyover; Demand to Public Works Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.