कॉन्टिनेंटलचे विमान धावपट्टीजवळ : विमान हटविण्याचे न्यायालयाचे आदेशनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीजवळ अनेक वर्षांपासून बंदस्थितीत उभे असलेले कॉन्टिनेंटल एअरलाईन्सचे विमान हटविण्याचे आदेश न्यायालयाने मिहान इंडिया लिमिटेडला (एमआयएल) दिले आहेत. विमान तातडीने हटवा, अन्यथा विमानतळाचा परवाना रद्द करण्यात येईल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडला विमान सुरक्षितस्थळी हलविण्यात अपयश आल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालकाने (डीजीसीए) विमान हटविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. अखेर डीजीसीएच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले आहेत. २५ वर्षांपासून विमान बंदस्थितीतनागपूर : हे विमान धावपट्टीजवळ बंदस्थितीत असल्यामुळे अन्य विमानांच्या उड्डाणासाठी धोकादायक आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालकाने आता कठोर पावले उचलली आहेत. कॉन्टिनेंटल एव्हिएशन लिमिटेडने जवळपास २५ वर्षांपूर्वी मुंबई-नागपूर-भोपाळ प्रवासी विमानसेवा सुरू केली होती. हे विमान मुंबईतून नागपुरात आल्यानंतर त्यात तांत्रिक बिघाड झाला होता. अखेर विमान दुरुस्त न झाल्याने अनेक वर्षांपासून विमानतळाजवळ बंदस्थितीत पडून आहे. या विमानाचे लॅन्डिंग आणि पार्किंग शुल्कात दिवसेंदिवस वाढ होतच आहे. हे विमान बोर्इंग-७२० या प्रकाराचे असून त्याची प्रवासी क्षमता १२० एवढी आहे. (प्रतिनिधी)
... तर विमानतळाचा परवाना रद्द होणार
By admin | Published: August 28, 2015 2:54 AM