लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डोळ्यातील दोषांमुळे अनेक जण निराशमय जीवन जगत असतात. परंतु अशा सर्व रुग्णांसाठी मेडिकलचा नेत्ररोग विभाग आशेचा किरण ठरले होता. राज्यातील कुठल्याच शासकीय रुग्णालयात नसलेले ‘आॅक्युलोप्लास्टी’ विभाग येथे सुरू झाला होता. परंतु दीड वर्षे होत नाही तोच मेडिकलच्या एका घटनेला त्रासून आॅक्युलोप्लास्टी तज्ज्ञ सोडून गेल्याने गेल्या एक महिन्यापासून तिरळेपणासह डोळ्याच्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. याचा फटका शेकडो गरीब रुग्णांना बसत आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागाने ‘रेटिनोपॅथी’, ‘लॅसिक लेझर’ आदी अद्ययावत उपचार सुरू करून एक उंची गाठली होती. यात ‘आॅक्युलोप्लास्टी’ तज्ज्ञाची भर पडल्याने हा विभाग पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. रुग्णांची सोय केंद्रस्थानी ठेवून मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी नेत्रशल्यचिकित्सा विभागाचा कायापालट केला होता. ज्या रुग्णांना सरकारी रुग्णालयांखेरीज दुसरा पर्याय नाही त्यांच्यासाठी हा बदल मोठा दिलासा देणारा होता. ‘आॅक्युलोप्लास्टी’तज्ज्ञ उपलब्ध झाल्याने या संदर्भातील गंभीर शस्त्रक्रियाही नि:शुल्क होऊ लागल्या होत्या. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये केवळ नागपुरात हा विभाग सुरू झाल्याने विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातील रुग्णांची गर्दी वाढली होती. दीड वर्षात शेकडो रुग्णांना याचा फायदा झाला. परंतु एका घटनेने दुखावलेल्या ‘आॅक्युलोप्लास्टी’ तज्ज्ञाने विभागच सोडून दिला. महिन्याभरपासून रुग्ण वाऱ्यावर पडले असून त्यांना नाईलाजाने दिल्ली येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला दिला जात आहे.
नागपुरात डोळ्यातील तिरळेपणासह कर्करोगाच्या शस्त्रक्रिया थांबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 8:39 PM
डोळ्यातील दोषांमुळे अनेक जण निराशमय जीवन जगत असतात. परंतु अशा सर्व रुग्णांसाठी मेडिकलचा नेत्ररोग विभाग आशेचा किरण ठरले होता. राज्यातील कुठल्याच शासकीय रुग्णालयात नसलेले ‘आॅक्युलोप्लास्टी’ विभाग येथे सुरू झाला होता. परंतु दीड वर्षे होत नाही तोच मेडिकलच्या एका घटनेला त्रासून आॅक्युलोप्लास्टी तज्ज्ञ सोडून गेल्याने गेल्या एक महिन्यापासून तिरळेपणासह डोळ्याच्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया थांबल्या आहेत.
ठळक मुद्देमेडिकल : दीड महिन्यापासून आॅक्युलोप्लास्टी बंद