शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कॅन्सर रुग्णांची धावपळ थांबणार

By admin | Published: June 25, 2014 1:26 AM

कॅन्सरच्या रु ग्णाला रक्त मिळण्यासाठी होणारी नातेवाईकांची धडपड आता थांबणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरने डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या मदतीने रक्त साठवणूक केंद्र

राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रक्त साठवणूक केंद्राचे उद्घाटननागपूर : कॅन्सरच्या रु ग्णाला रक्त मिळण्यासाठी होणारी नातेवाईकांची धडपड आता थांबणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरने डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या मदतीने रक्त साठवणूक केंद्र सुरू केले आहे. मंगळवारी या केंद्राचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी कॅन्सर रिलीफ सोसायटीचे उपाध्यक्ष बसंतलाल शॉ, सचिव अशोक क्रिपलानी, रंधिर झव्हेरी, महेश साधवानी, सुधीर भिवापूरकर, हेडगेवार रक्तपेढीचे डॉ. विजय तुंगार व हॉस्पिटलचे सहायक संचालक डॉ. बी.के. शर्मा उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, जागरूकतेचा अभाव, उशिरा निदान यामुळे कॅन्सरचे विदर्भात प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यात राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलने उचललेले हे पाऊल स्तुत्य आहे. रक्त साठवणूक केंद्रामुळे हॉस्पिटलमध्ये रुग्णांना २४ तास रक्त उपलब्ध होईल. कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी सर्वांंनी मिळून काम करणे आवश्यक आहे. शॉ यांनी आपल्या भाषणातून रक्तदानाचे आवाहन केले. ते म्हणाले, कॅन्सर रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्त लागते. यामुळे प्रत्येकाने रक्तदान करावे. हॉस्पिटलमधील या रक्त साठवणूक केंद्राचा फायदा रुग्णांनी घ्यावा, असेही ते म्हणाले.डॉ. शर्मा म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये २००३ मध्ये आचार्य तुलसी ब्लड बँकेच्या नावाने रक्तपेढी चालायची. परंतु नंतर ती बंद पडली. आता रक्तपेढी तर नाही परंतु रक्त साठवणूक केंद्र सुरू करण्यात यश आले आहे. डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या मदतीने हे केंद्र सुरू राहील. सुरुवातीला प्रत्येक ग्रुपच्या रक्ताच्या पिशव्या ठेवण्यात येईल. नंतर मागणीनुसार त्यात वाढ करण्यात येईल. आभार प्रदर्शन डॉ. अंजली कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाला हेडगेवार रक्तपेढीचे डॉ. दिलीप गुप्ता, डॉ. अशोक पत्की व इतर मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)