लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लग्नसराई, समारंभ आणि कार्यक्रमांमध्ये गावागावांत व शहरांमध्ये कॅनमधून मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याची विक्री करण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू आहे. असा व्यवसाय करणाऱ्यांवर फूड सेफ्टी कायद्यांतर्गत सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेमार्फत तपासणी करून संबंधित कारखाने आणि विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केली आहे.पाण्यावर कोणतीही प्रक्रिया नाहीवितरण करण्यात येणारे पाणी खरंच शुद्ध आहे का, हा गंभीर प्रश्न आहे. याकडे आरोग्य विभागांकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. खरंतर युव्ही स्टरलायझेशन, सूक्ष्म गाळणी व ओझोनायझेशन इत्यादी प्रक्रिया करूनच पाणी कॅनद्वारे उपलब्ध व्हावे, असे अपेक्षित आहे. परंतु गल्लीबोळात कारखाने लावून मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाणी सर्रास विकले जाते आहे. याकडे अन्न व औषधी प्रशासनाने लक्ष द्यावे, अश्ी मागणी करीत लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये पाण्याची विक्री करून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत असल्याकडे पांडे यांनी लक्ष वेधले आहे.नागरिकांच्या आरोग्याशी खेळअन्न व औषधी प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या माध्यमाद्वारे कुठलीही चाचणी व शहानिशा होत नसल्याची तक्रार वारंवार अन्न व औषधी प्रशासन विभाग, वैधमापनशास्त्र विभाग, आरोग्य विभागाकडे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत करण्यात आली आहे. परंतु याची प्रशासन गंभीर दखल घेत नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एक कॅन पाण्याची किंमत २० ते ६० रुपयांपर्यंत आहे. याउलट महानगरपालिका ७ ते १० रुपयांमध्ये एक युनिट म्हणजे हजार लिटर पाणी नागरिकांना पुरविते, याकडेही पंचायतने लक्ष वेधले आहे.परवाना दिला कुणी?कॅनची प्रत्यक्षात किंमत किती, विकले जाणारे पाणी आरोग्याला खरचं योग्य आहे का, विक्री परवाने आहेत का, कारखान्याला कोणत्या विभागाने परवानगी दिली आदींची माहिती प्रशासनाने ग्राहकांना उपलब्ध करून द्यावी आणि गोरखधंदा करणारे व नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कडक कारवाई करावी, अशी मागणी पांडे यांच्यासह पंचायतचे अध्यक्ष स्मिता देशपांडे, संजय धर्माधिकारी, डॉ. नारायण मेहेरे, सुधीर मिसार, डॉ. अजय गाडे, अॅड. गौरी चांद्रायण, सुधांशु दाणी, प्रमोद भागडे, गणेश शिरोळे, प्रवीण शर्मा, दत्तात्रय कठाळे, अनिरुद्ध गुप्ते, अॅड. प्रेमचंद्र मिश्रीकोटकर, विनोद देशमुख यांनी केली आहे.
कॅनमधून थंड पाणी विकण्याचा गोरखधंदा सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 1:13 AM
लग्नसराई, समारंभ आणि कार्यक्रमांमध्ये गावागावांत व शहरांमध्ये कॅनमधून मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याची विक्री करण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू आहे. असा व्यवसाय करणाऱ्यांवर फूड सेफ्टी कायद्यांतर्गत सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेमार्फत तपासणी करून संबंधित कारखाने आणि विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केली आहे.
ठळक मुद्दे ग्राहक पंचायतचा आरोप : परवाना कुणी दिला?