शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
5
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
6
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
7
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
8
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
9
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
10
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
11
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
12
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
13
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
14
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
15
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
16
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
17
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
18
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
19
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
20
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट

कॅपिटल हाईटस् एक ‘स्मार्ट सिटी’

By admin | Published: March 20, 2015 2:16 AM

टाटा समूहाच्या टाटा रिअ‍ॅलिटी अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचा मेडिकल चौक या शहराच्या मध्यवर्ती भागात उभा होणारा आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण

नागपूर : टाटा समूहाच्या टाटा रिअ‍ॅलिटी अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचा मेडिकल चौक या शहराच्या मध्यवर्ती भागात उभा होणारा आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण ‘कॅपिटल हाईट्स’ हा निवासी व व्यावसायिक प्रकल्प एक लहान ‘स्मार्ट सिटी’ असल्याचा दावा कंपनीच्या सहायक महाव्यवस्थापक (विक्री व विपणन) वंदना रघुवंशी यांनी लोकमतशी बोलताना केला.आधुनिक जीवनशैलीचा हा प्रकल्प आहे. १० एकरातील प्रकल्पात साडेतीन एकर व्यावसायिक आणि साडेसहा एकरात निवासी व्यवस्था आहे. उच्चवर्गीयांना हव्या त्या सुविधा प्रकल्पात उभारण्यात येत आहेत. बांधकाम वेगात सुरू आहे. प्रकल्पाचा प्रारंभ आॅक्टोबर २०१२ रोजी झाला तर स्वप्नातील घरांचा ताबा बांधकाम आणि सुविधांच्या परिपूर्णतेनंतरच डिसेंबर २०१५ मध्ये देण्यात येणार आहे. नागपुरातील सर्वात उंच टॉवर या प्रकल्पात आहेत. सर्व विभागाच्या मंजुरीनंतरच प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यात आले. २, ३ आणि ४ बीएचकेचे अपार्टमेंट अर्थात ३ हजार ते ४२०० चौरस फूटाची फ्लॅट, डुप्लेक्स आणि पेंट हाऊसेस आहे. या प्रकल्पामुळे नागपूरकरांची जीवनशैली बदलणार असल्याचा विश्वास रघुवंशी यांनी व्यक्त केला. ‘आयजीबीसी’ची मंजुरीपर्यावरणावर विशेष लक्ष दिले आहे. इंडियन ग्रीन बिल्डिंग कॉन्सिलचे (आयजीबीसी) प्री-गोल्ड प्रमाणपत्र मिळाले आहे. रेन हार्वेस्टिंग, वेस्ट वॉटर ट्रिटमेंट, जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश व्यवस्थेसाठी व्हेन्टिलेशन आदींवर भर दिला आहे. बांधकाम आणि गुणवेत्तीसाठी कुठलीही तडजोड केलेली नाही.चारही इमारतीत विशेष सुविधाया प्रकल्पात चार इमारती आहेत. त्यापैकी दोन इमारती १७ माळ्यांच्या तर दोन इमारतीत २० माळे आहेत. जीवनावश्यक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध व्हावीत, या दृष्टीने सहा दुकाने राहतील. सुरक्षेच्या दृष्टीने प्रकल्पात ये-जा करिता एकच प्रवेशद्वार आहे. सुरक्षा गार्ड, सर्व परिसरात सीसीटीव्ही, पाहुण्यांच्या भेटीसाठी प्रत्येक इमारतीत वातानुकूलित लॉबी, प्रत्येकाकडे डोअरफोन कॅमेरा राहील. पोडियम स्टाईल विकास आहे. त्यामुळे इमारतीच्या परिसरात वाहनांना मज्जाव असणार आहे. रहिवाशांसाठी क्लब हाऊस, खुल्या जागेत लहानांना खेळण्यासाठी जागा, जॉगिंग ट्रॅक, योगा कोर्ट, फिटनेस सेंटर, बास्केटबॉल, टेनिस कोर्ट, पार्टी लॉन, वॉटर फिचर्स, प्रत्येक वयोगटातील प्ले झोन आहे. एफएनबी परिसरासह बॅन्केट हॉल, लहान आणि मोठ्यांसाठी वेगवेगळे स्विमिंग पूल, स्वॅश कोर्ट, मिनी प्रोजेक्टर रूम आदी सुविधा राहणार असल्याचे रघुवंशी म्हणाल्या. साडेतीन एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या व्यावसायिक मॉलमध्ये ग्राहकांचा प्रवेश स्वतंत्ररित्या राहणार आहे. त्याचा रहिवाशांना कुठलाही त्रास होणार नाही. मॉलमधील जागा लीज पद्धतीवर व्यावसायिकांना देण्यात येणार आहे. आठ वर्षे जुन्या टाटा रिअ‍ॅलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे सर्व प्रकल्प प्रीमियम आहेत. निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प चेन्नई, मुंबई, पुणे, कोची, बेंगळुरू, अमृतसर आणि मेट्रो शहरांमध्ये सुरू आहेत. तळमाळ्यावर आधुनिक पार्किंग व्यवस्थाया प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, इमारतीच्या सभोवताल कुठल्याही वाहनाची ये-जा दिसणार नाही. आधुनिक पार्किंग व्यवस्था तळमाळ्यावर आहे. प्रकल्पात ३५२ फ्लॅट असल्याने जवळपास ५०० वाहने पार्किंगमध्ये असतील. ड्रायव्हर्सला बसण्यासाठी वेगळी व्यवस्था आणि इंटरकॉम सुविधा राहणार आहे. कंपनी १० वर्षे देखभाल करणारघरांचा ताबा दिल्यानंतर कंपनी पुढील १० वर्षे प्रकल्पाची देखभाल करणार आहे. प्रकल्पाचे सौंदर्य टिकून राहावे, हा यामागील हेतू आहे. यासाठी रहिवाशांकडून काही शुल्क आकारण्यात येणार आहे. चर्चेवेळी कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक (विक्री व विपणन) सौरभ जैन उपस्थित होते.(वा. प्र.)