लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : भरधाव कारने प्रवासी ऑटाेला मागून जाेरात धडक दिली. त्यात ऑटाेतील एका प्रवाशाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, दाेन्ही वाहनातील एकूण १० जण जखमी झाले. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-सावनेर-पांढुर्णा मार्गावरील हेटी शिवारात शनिवारी (दि. २३) सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास घडली.
नागोराव तुरणकर (५५, रा. खापा-नरसाळा, ता. सावनेर) असे मृताचे नाव असून, जखमींमध्ये कारचालक शरद शिवशंकर शर्मा (६०) व त्यांच्या पत्नी शीला शरद शर्मा (५८) रा. भिलाई, छत्तीसगड, ऑटाेमधील उमेश रवींद्र मोवाडे (२२), सुलोचना रवींद्र भुजाडे (३५), मुकेश अमरसिंग ताकिया (२१), डोमाजी शामराव कोसरकर (८०), लक्ष्मण नागोराव भुजाडे (६५), कांता लक्ष्मण भुजाडे (५२) सर्व रा. उमरी, ता. सावनेर सुरेश नरसिंग बंजारन (२५) व परी सुरेश बंजारन (२३) दाेघेही रा. केसला-उसनगाव, मध्य प्रदेश यांचा समावेश आहे.
शरद शर्मा व त्यांच्या पत्नी शीला या सीजी-०८/जी-७२०० क्रमांकाच्या कारने भाेपाळ(मध्य प्रदेश)ला जात हाेते. तर इतर आठ जण एमएच-४०/पी-२२७९ क्रमांकाच्या ऑटाेने सावनेरहून उमरीला जात हाेते. हेटी शिवारात मागून वेगात आलेल्या कारने समाेर असलेल्या ऑटाेला जाेरात धडक दिली. या धडकेमुळे ऑटाे व कार राेडलगतच्या सात फूट खाेल खड्ड्यात शिरली. यात गंभीर दुखापत झाल्याने नागाेराव तुरणकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर शरद शर्मा, उमेश माेवाडे, सुलाेचना माेवाडे व मुकेश ताकिया हे चाैघे गंभीर तर इतर सात जण किरकाेळ जखमी झाले.
अपघात हाेताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी सर्व जखमींना तातडीने सावनेर येथील शासकीय रुग्णालयात आणले. गंभीर जखमींवर प्रथमाेपचार करून नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्याची व्यवस्था केली तर, किरकाेळ जखमींवर उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली. शिवाय, नागाेराव यांच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी प्रक्रिया करण्यात आली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.