लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर/कळमेश्वर/नरखेड/हिंगणा/उमरेड/काटाेल/कुही/रामटेक : ग्रामीण भागात काेराेनाचे संकट कायम आहे. जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात शनिवारी (दि. २४) २५३ रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, कळमेश्वर तालुक्यात २२९, नरखेडमध्ये १६५, हिंगणा तालुक्यात १५१, उमरेडमध्ये १०४, काटाेलमध्ये ९०, कुही तालुक्यात ७९, तर रामटेक तालुक्यात ७७ रुग्णांची नाेंद करण्यात आली.
सावनेर तालुक्यात २५३ रुग्ण आढळून आले असून, यात सावनेर शहरातील ६५ व ग्रामीण भागातील १८८ रुग्णांचा समावेश आहे. कळमेश्वर तालुक्यात २२९ रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात कळमेश्वर ब्राह्मणी शहरातील २७ तर तालुक्यातील गोंडखैरी येथील ३९, पिपळा २३, मांडवी १२, मोहगाव ११, मोहपा १०,
खैरी (लखमा), कोहळी व म्हसेपठार येथील प्रत्येकी ८,
सेलू व दाढेरा येथील प्रत्येकी ६, चौदामैल ५, उपरवाही, घोगली, तेलगाव, घोराड, कोकर्डा व कन्याडोल येथील प्रत्येकी ४,
निमजी, लोहगड व नांदिखेडा येथील ३, लिंगा, सुसंद्री, डुकरबर्डी व पानउबाळी प्रत्येकी २, खैरी (हरजी), खापरी, उबगी, दहेगाव, लोणारा, बेल्लारी, सावंगी, सावळी, तिष्टी (बु), कळंबी, झिल्पी, तेलकामठी, आष्टीकला, सवंद्री, बुधला, केतापार, तिष्टी (खुर्द), देवबर्डी, वाढोणा (खुर्द), शंकरपट व उबाळी येथील प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
नरखेड तालुक्यात १६५ रुग्ण आढळून आले. यात शहरातील १९ व ग्रामीण भागातील १४६ रुग्ण आहेत. सावरगाव प्राथमिक आराेग्य केंद्रातील गावांमध्ये ५०, जलालखेडा प्राथमिक आराेग्य केंद्रातील गावांमध्ये ३१, मेंढला प्राथमिक आराेग्य केंद्रातील गावांमध्ये ५२ तर मोवाड प्राथमिक आराेग्य केंद्रातील गावांमध्ये १३ रुग्ण काेराेना पाॅझिटिव्ह आहेत. तालुक्यात एकूण २,४५९ ॲक्टिव्ह रुग्ण असून, यात शहरातील ३६५ तर ग्रामीण भागातील २,०९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
हिंगणा तालुक्यात १५१ रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात वानाडोंगरी शहरात ४३, डिगडोह २०, इसासनी १२, हिंगणा ११, रायपूर ८, किन्ही (धानोली) ५, मोहगाव व नीलडोह येथील प्रत्येकी ४, अडेगाव, गुमगाव, मोंढा व संगम येथील प्रत्येकी ३, कवडस, खिरोदा व टाकळघाट येथील प्रत्येकी २, चिचोली (पठार), डिगडोह (पांडे), गिरोला, उखळी, सुकळी (कलार), मोहगाव (ढोले), गिदमगड व वागदरा येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.