लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाखो नागरिकांना घातक सुपारी खाऊ घालून त्यांना कर्करोगाच्या जबड्यात ढकलणाºया तसेच कोट्यवधींची उलाढाल करून करबुडवेगिरी करणाºया नागपूरच्या सुपारीबाजांची विशेष पथकाकडून चौकशी सुरू झाली आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीने गुरुवारी दुपारी मुंबईहून नागपुरात आलेल्या डीआरआय पथकाने कळमन्यासह ठिकठिकाणी चौकशी करून गेल्या २४ तासात २० कोटींच्या सुपारीची चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे. या संबंधाने स्थानिक अधिकारी आणि व्यापारी काहीच बोलायला तयार नसल्याने येथे आलेल्या चौकशी पथकाच्या कारवाईचे नेमके स्वरूप स्पष्ट झालेले नाही.बाहेर देशातून आलेली कोट्यवधींची सडकी सुपारी नागपुरात येत असली तरी त्यासंबंधाने सरकारला महसूल मात्र मिळत नसल्याचे संबंधित यंत्रणेच्या लक्षात आले आहे. करबुडवेगिरी करणाºयांची माहिती संकलित करून त्यासंबंधाने चौकशी करण्यासाठी डायरेक्टर आॅफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सचे (डीआरआय) एक पथक गुरुवारी दुपारी नागपुरात दाखल झाल्याचे समजते.इंडोनेशियासह सुपारीचे सर्वाधिक उत्पन्न करणाºया देशात निकृष्ट सुपारी घाणीत फेकली जाते. ही घातक सुपारी देशातील विविध भागात आणून तिच्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेतून सुपारीचा रंग पांढराफटक होतो आणि ती ताजी वाटत असली तरी आधीच निकृष्ट असलेली ही सुपारी रासायनिक प्रक्रियेनंतर आरोग्यासाठी अधिकच घातक होते. या सुपारीचा खर्रा, सुगंधित पानमसाला, गुटखा यात वापर करून त्या माध्यमातून सुपारीबाज कोट्यवधींची मलाई घशात कोंबतात. नागरिकांच्या तोंडात मात्र ते या सुपारीच्या माध्यमातून कर्करोगासारखा भयंकर रोग ठेवतात. सुपारीबाजांच्या या पापात कारवाईचा अधिकार असलेले काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचारीही सहभागी आहेत. त्याचमुळे नागपुरात मोठ्या प्रमाणात सडकी सुपारी आणून तिच्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते आणि घातक सुपारीचे अनेक ट्रक महाराष्ट्रातील विविध शहरांसह विविध राज्यात बिनबोभाट पाठविले जातात. लोकमतने हा गोरखधंदा आणि त्यातून होणारी कोट्यवधींची उलाढाल वेळोवेळी प्रकाशित करून सुपारीबाजांची डावबाजी उघड केली आहे. बाहेर देशातून आणलेली सडकी सुपारी विकून कोट्यवधी रुपये कमविले जात असले तरी सरकारला मात्र कर (महसूल) दिला जात नाही, हे लक्षात आल्यामुळे केंद्राच्या डीआरआय विभागाने या गोरखधंद्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी मुंबईहून आलेल्याअधिकाºयांच्या या पथकाने सुपारीबाजांची गोपनीय चौकशी करून २० कोटींची सडकी सुपारीचा व्यवहार रेकॉर्डवर आणल्याचीही चर्चा आहे. यामुळे सुपारीबाजात आणि त्यांची पाठराखण करणाºयात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.धावपळ आणि लपवाछपवीडीआरआयच्या पथकाकडून गुरुवारपासून सुरू असलेल्या कारवाईमुळे सुपारीबाज तसेच त्यांच्या दलालांची धावपळ वाढली आहे. मात्र, त्यासंबंधाने कुणी काहीही बोलायला तयार नाहीत. सुपारीबाज केवळ कारवाई सुरू असल्याचे मान्य करतात. मात्र, कारवाईचे स्वरूप काय, ते सांगायला तयार नाहीत. तर, या कारवाईचा अधिकार असलेले अन्न व औषध विभागाचे अधिकारीही स्पष्ट बोलायला तयार नाही. एका अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर डीआरआयने २० कोटींच्या सुपारीवर कारवाई केल्याचे सांगितले. परंतू, कारवाई करणाºया अधिकाºयांची नावे अथवा संपर्क क्रमांक माहीत नसल्याचे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला. कारवाई होऊनही ही लपवाछपवी का केली जात आहे, ते कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे, वाडीतील प्रकरणात काही स्थानिक अधिकाºयांना हाताशी धरून सुपारीबाजांनी हे प्रकरण दडपण्यात जवळपास यश मिळवले आहे. वाडी पोलीस तसेच एफडीएचे किरण गेडाम यांची चौकशी केल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यांच्यावर कोणती कारवाई केली, हे सांगण्यास दोन्ही विभागाची मंडळी टाळाटाळ करीत आहेत.
सुपारीबाजांकडून करबुडवेगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 1:32 AM
लाखो नागरिकांना घातक सुपारी खाऊ घालून त्यांना कर्करोगाच्या जबड्यात ढकलणाºया तसेच कोट्यवधींची उलाढाल करून करबुडवेगिरी करणाºया नागपूरच्या सुपारीबाजांची विशेष पथकाकडून चौकशी सुरू झाली आहे.
ठळक मुद्देविशेष पथकाने चालविली चौकशी : संबंधितांमध्ये खळबळ