लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर/हिंगणा/नरखेड/सावनेर/उमरेड/काटाेल/कुही/कन्हान : नागपूर जिल्ह्यात (शहर वगळता) गुरुवारी (दि. २०) काेराेनाच्या एकूण ५७८ रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात सर्वाधिक ११४ रुग्ण कळमेश्वर तालुक्यात आढळून आले असून, हिंगण्यात ६०, नरखेड तालुक्यात २५, सावनेरमध्ये २३, काटाेलमध्ये १७, कुहीत आठ, तर कन्हान येथील सात नवीन रुग्णांचा समावेश आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत ग्रामीण भागात काही ठिकाणी संक्रमण कमी हाेत असून, काही ठिकाणी ते स्थिर असल्याचे दिसून येते.
कळमेश्वर तालुक्यात गुरुवारी ११४ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राम्हणी शहरातील ४२ल तर ग्रामीण भागातील ७२ रुग्ण आहेत. या ७२ रुग्णांमध्ये आष्टी (कला) येथील १०, उपरवाही ५, चौदामैल, साहुली, लिंगा, कोहळी व धापेवाडा येथील प्रत्येकी ४, खापरी व उबाळी येथील प्रत्येकी ३, सावंगी, उबगी, सोनेगाव, मडासावंगी, मांडवी, मोहपा व नांदिखेडा येथील प्रत्येकी २, खैरी (हरजी), गुमथळा, लोणारा, कळंबी, सेलू, बेल्लारी, दहेगाव, निमजी, तोंडाखैरी, वरोडा, सावंगी (मोहगाव), धुरखेडा, घोराड, सवंद्री, म्हसेपठार, वाढोना (खुर्द) व तेलगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
हिंगणा तालुक्यात ६२१ नागरिकांच्या चाचण्यांचे रिपाेर्ट प्राप्त झाले असून, यातील ६० जणांना काेराेनाची लागण झाल्याचे आढळून आले. यात वानाडोंगरी येथील १२, डिगडोह ९, कान्होलीबारा ७, टाकळघाट ६, इसासनी ४, हिंगणा व देवळी (पेंढारी) येथील प्रत्येकी ३, गिदमगड २, देवळी (काळबांडे), वटेघाट, खैरी (खुर्द), उखळी, मांगली, मोहगाव, धानोली, देवळी (सावंगी), नीलडोह, रायपूर, मांडवघोराड, घोडेघाट, गिरोला व वटेघाट येथील प्रत्येकी एक रुग्ण पाॅझिटिव्ह आहे.