लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरून राेज हजाराे नागरिक प्रवास करतात. त्यात काेण काेराेना संक्रमित आहे आणि काेण नाही हे कळत नसल्याने काेंढाळी (ता. काटाेल) प्राथमिक आराेग्य केंद्राच्यावतीने या राष्ट्रीय महामार्गावरील काेंढाळी येथील वर्धा टी पाॅईंटजवळ वाहनचालक, वाहक व वाहनातील प्रवाशांची काेराेना टेस्ट करायला सुरुवात केली आहे. यात काही नागरिक विनाकारण हुज्जत घालत असल्याने त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी पाेलीस प्रशासनाची मदत घेण्यात आली आहे. काेराेना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे खंडविकास अधिकारी संजय पाटील यांनी सांगितले.
सध्या लाॅकडाऊन असले करीत नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गाने अमरावती, नागपूर, अकाेला, बुलडाणा यासह या मार्गावरील अन्य शहरांमधील नागरिक खासगी वाहनांनी राेज प्रवास करतात. यात रुग्णवाहिका, रुग्णांचे नातेवाईक व इतरही असतात. या प्रवाशांमध्ये काही काेराेना पाॅझिटिव्ह असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागपूर शहर, ग्रामीण व लगतच्या अमरावती व वर्धा जिल्ह्यात काेराेना संक्रमण हाेण्याची शक्यता असते. हा महामार्ग काेंढाळी येथून जात असल्याने येथे या प्रवाशांची काेराेना टेस्ट करण्याची माेहीम हाती घेण्यात आली आहे, असे खंडविकास अधिकारी संजय पाटील यांनी सांगितले.
परिणामी, या मार्गावर प्रवास करणाऱ्यांचे प्रत्येक वाहन काेंढाळी येथील वर्धा टी पाॅईंटजवळ थांबविले जात असून, प्रवाशांना काेराेना प्रतिबंधक उपाययाेजना व लसीकरणाचे महत्त्व थाेडक्यात समजावून सांगितले जात आहे. शिवाय, वाहनचालक, वाहक व वाहनातील सर्व प्रवाशांची ॲंटिजन टेस्ट केली जात आहे. या जी व्यक्ती काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आली, त्यांना परत पाठविण्यात येत असून, निगेटिव्ह व्यक्तीला प्रमाणपत्र देऊन नागपूर, अमरावती व वर्धा जिल्ह्यात जाण्याची परवानगी दिली जात आहे. ही माेहीम दाेन दिवसांपासून सुरू करण्यात आल्याची माहिती ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांनी दिली.
...
फिरणारे रुग्ण काेविड सेंटरमध्ये
ग्रामीण व शहरी भागातील काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांना गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जात असून, त्यांच्या औषधाेपचाराचीही साेय केली जात आहे. मात्र, काही रुग्ण कुणाचेही न ऐकता घराबाहेर पडून मनसाेक्त फिरतात. ताे काेराेना सुपर स्प्रेडर असल्याने इतरांसाठी घातक ठरत आहे. त्यामुळे अशा बाहेर फिरणाऱ्यांना रुग्णांचा शाेध घेऊन त्यांची तातडीने पाेलिसांना माहिती द्यावी व काेविड सेंटरमध्ये रवानगी करावी, असे आदेश सरपंच व ग्रामसेवकांना दिले आहेत, अशी माहिती खंडविकास अधिकारी संजय पाटील यांनी दिली.