कामठी : तालुक्यातील तराेडी (बु.) येथे शुक्रवार(दि. २६)पासून काेराेना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरणाची साेय झाल्याने गावातील ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या लसीकरणाच्या शुभारंभाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकुरवाळे, अनिल निधान, पंचायत समिती सभापती उमेश रडके, उपसभापती आशिष मल्लेवार, तालुका आराेग्य अधिकारी डॉ. संजय माने, पंचायत समिती सदस्य दिलीप वंजारी, सरपंच अरविंद फुलझेले, उपसरपंच अमोल महल्ले, ग्रामविकास अधिकारी बरमानंद खडसे, टेमसना येथील सरपंच अनिकेत शहाणे, खेडीच्या सरपंच भारती देवगडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. या लसीकरण केंद्रात पहिल्या टप्प्यात तरोडी (बु.), खेडी, टेमसना, कुसुंबी, परसोडी, आडका, केम, परसाड, दिघोरी, पांढुर्णा, पांढरकवडा, महालगाव येथील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.