कामठी : शहरासह ग्रामीण भागात काेराेना संक्रमण वाढत आहे. लिहिगाव (ता. कामठी) येथेही काेराेनासंक्रमित रुग्ण आढळून आले असून, येथे स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात काेराेना प्रतिबंधक लसीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे.
याप्रसंगी तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. संजय माने, सरपंच गणेश झोड, उपसरपंच सुनीता ठाकरे, गुमथळा प्राथमिक आराेग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. तिवारी, संजय कुराडे, आरोग्यसेविका माया मडावी, एन. आंबिलकर, रवींद्र निकाळजे, सुषमा ठाकरे, विशाखा बोरकर, हरिष निकाळजे, सुनीता सोनटक्के, ग्रामविकास अधिकारी श्याम उचेकर उपस्थित हाेते.
लसीकरणाला वेग यावा म्हणून स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने गावात जनजागृती केली जात असून, नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर केला जात आहे. लिहिगाव येथील लसीकरण आठवडाभर सुरू राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. तिवारी यांनी दिली.