लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर स्मार्ट सिटीतर्फे नागपूर सेफ अॅण्ड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात ७०० जंक्शन बॉक्स लावण्यात आले आहेत. संबंधित बॉक्सेसवर अनधिकृत पद्धतीने जाहिरात पत्र, स्टीकर्स लावण्यात आले आहेत. अंबाझरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संपत्ती विकृतीकरण प्रतिबंध अधिनियम १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संबंधित जंक्शन बॉक्सेसवर रिलीफ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वास केंद्र, सनबर्न रिलोड आणि जमशेदसिंह कपूर ज्योतिष विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरकारी संपत्तीला नुकसान पोहोचवण्याबाबत कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाझरी टी पॉईंट जंक्शनवर रिलीफ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वास केंद्र, लॉ कॉलेज चौक रविनगपर चौक, भरतनगर चौक, फुटाळा तलाव टर्निंग व सुदामनगरी टर्निंगवरील जंक्शन बॉक्सवर सनबर्न रिलोड आणि जमशेद सिंह कपूर ज्योतिषचे पोस्टर लागलेले होते.शहरभरात सार्वजनिक संपत्तीवर बॅनर-पोस्टर, स्टीकर लावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यासह शासकीय संपत्तीलाही नुकसान पोहोचते. यामुळे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याअंतर्गत तक्रार दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापुढे अशा प्रकरणात आणखी तक्रारी करीत गुन्हे दाखल केले जातील.स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांच्या तक्रारीवर पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी जाहिराती लावणाऱ्या अशा सर्वांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.शहरातील भिंतीचे विद्रुपीकरणसार्वजनिक संपत्तीसह भिंती, चौक, उद्यान आदी ठिकाणी अवैध पद्धतीने बॅनर-पोस्टर, स्टीकर लावणाऱ्यांनी शहरातील भिंती विद्रुप करून ठेवल्या आहेत. या प्रकरणात यापूर्वीही झोनच्या सहायक आयुक्तांकडून कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली होती. परंतु नंतर कारवाई थंड बस्त्यात पडली. अशा परिस्थितीत पुन्हा अवैध जाहिराती लावणाऱ्यांची हिंमत वाढली. दंडासोबतच अशा जाहिराती लावणाऱ्यांवर कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे.
नागपुरात जंक्शन बॉक्सवर जाहिरात लावणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 10:57 PM
नागपूर स्मार्ट सिटीतर्फे नागपूर सेफ अॅण्ड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात ७०० जंक्शन बॉक्स लावण्यात आले आहेत. संबंधित बॉक्सेसवर अनधिकृत पद्धतीने जाहिरात पत्र, स्टीकर्स लावण्यात आले आहेत. अंबाझरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संपत्ती विकृतीकरण प्रतिबंध अधिनियम १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देस्मार्ट सिटी प्रकल्प विभाग : तिघांविरुद्ध अंबाझरी पोलिसात तक्रार