शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

महिला होमगार्डचा विनयभंग करणाऱ्या ठाणेदारावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:07 AM

----------------------- - डीसीपी साहू यांनी केली चाैकशी - अनेकींशी गैरवर्तनाचा आरोप - निलंबनाची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - ...

-----------------------

- डीसीपी साहू यांनी केली चाैकशी

- अनेकींशी गैरवर्तनाचा आरोप - निलंबनाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - महिला होमगार्डला आपल्या कक्षात बोलवून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करणारे यशोधरानगरचे ठाणेदार अशोक मेश्राम यांच्यावर त्यांच्याच पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घडामोडीमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

तक्रार करणारी महिला होमगार्ड २४ वर्षांची आहे. ती २ जूनपासून यशोधरानगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होती. ठाणेदार मेश्रामने तिची ड्युटी आपल्या कक्षासमोर (बेल ड्युटी) लावून घेतली. तिची काैटुंबिक स्थिती विचारून तिला ‘तुला पीएसआय’ बनवितो, असे सांगून तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचे प्रयत्न केले. तिला फोन आणि मेसेज करूनही सलगी साधली. ती फारसा प्रतिसाद देत नसल्याचे पाहून बुधवारी सायंकाळी मेश्रामने तिला आपल्या कक्षात बोलविले. तिला लाईन गार्ड (वर्दीच्या खांद्यावर असलेली दोरी)चे बटन लावून मागण्याच्या बहाण्याने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. या प्रकारामुळे महिला होमगार्ड रडू लागली. तेवढ्यात तिचा मावसभाऊ पोलीस ठाण्यात आला. त्याला पीडित महिलेने हा प्रकार सांगितला. त्याने हे प्रकरण पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्याकडे नेले. नीलोत्पल यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना मेश्रामविरोधातील तक्रार सांगितली. आयुक्तांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली. मेश्राम यांची गुरुवारी सकाळीच ठाण्यातून उचलबांगडी करून त्यांना नियंत्रण कक्षात रुजू होण्याचे आदेश दिले. दुसरीकडे या गंभीर प्रकरणाची चाैकशी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनीता साहू यांच्याकडे सोपविली. साहू यांनी गुरुवारी दिवसभर पीडित महिला होमगार्ड, तसेच ठाण्यात अन्य काही महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांची चौकशी केली. चाैकशीत अनेक महिलांनी मेश्राम यांच्या तक्रारी केल्या. तसा अहवाल उपायुक्त साहू यांनी पोलीस आयुक्तांना दिला. त्यावरून त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर, मेश्रामविरुद्ध विनयभंग करून धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

---

एक हजार रुपये दिले

विनयभंग केल्यानंतर होमगार्ड महिलेने विरोध केल्याने मेश्राम घाबरला. त्याने तिच्या हातात एक हजार रुपये कोंबून तिला गप्प राहण्यास बजावले. मात्र, पीडितेला तिच्या मैत्रिणींनी हिंमत दिल्याने या प्रकरणाचा बोभाटा झाला.

---

फिरायला जाण्याची इच्छा

मेश्रामचे यापूर्वीही महिलेच्या संबंधाने दोनदा बोंब झाली. दोन वर्षांपूर्वी लुटेरी दुल्हनशी सलगी असूनही काही मित्रांमुळे ते बचावले. यशोधरानगर ठाण्यात एकीला १० हजारांचे गिफ्ट देऊन फिरायला नेण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही प्रकरण या तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे तो दुसरा गुन्हा दाखल होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

---