प्रधानमंत्री आवास योजनेत स्वस्तात घरे मिळवून देण्याची थाप मारून कुख्यात बघेलने शेकडो गरजूंकडून लाखो रुपये हडपले आणि पळून गेला होता. लोकमतने हे प्रकरण लावून धरल्यानंतर रविवारी कुख्यात बघेलला यशोधरानगर पोलिसांनी एका कॉलगर्लसोबत पकडले. त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याचा तपास सुरू असताना ३६ वर्षांची महिला पोलिसांकडे पोहचली. आरोपी बघेलने ५ मार्चला १ वाजता जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसवले. स्वत:च्या घरी नेऊन पाशवी बलात्कार केला. या प्रकाराबाबत कुणाला काही सांगितले तर तुझ्या वहिनी आणि भावाला ठार मारेन, अशी धमकी देऊन गप्प केले, अशी तक्रार तिने दिली. त्यावरून यशोधरानगर पोलिसांनी आरोपी बघेलविरुद्ध अपहरण करून बलात्कार करणे आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
----
शाळकरी मुलीचे अश्लील व्हिडिओ
नागपूर : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका आरोपीने शाळकरी मुलीला पैशाची मागणी केली. जीवे मारण्याचीही धमकी दिल्याचे प्रकरण हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आले आहे.
पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, १२ वर्षांची ही मुलगी १ एप्रिलला रोहित राजपूतच्या आयडीवरून फ्री फायर बॅड शहजादसोबत फ्री फायर हा ऑनलाईन गेम खेळत होती. मुलीला त्यात हरविल्याचे सांगून रोहित राजपूतने २२०० रुपये मागितले. ते दिले नाही म्हणून त्याने तिला स्वत:चे अश्लील व्हिडिओ पाठवण्यास सांगतले. नंतर ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने पुन्हा २२०० रुपयांची मागणी केली. जीवे मारण्याचीही धमकी दिली. तिच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी राजपूतविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
----