शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

नागपुरातील फॅक्टरी स्फोटात सहा महिन्यांनी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 4:33 PM

मालकाने हलगर्जी केल्याचा ठपका : दोन कामगारांचा झाला होता मृत्यू

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जानेवारी महिन्यात उप्पलवाडी येथील बालाजी आईस फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटात दोघांचा बळी गेला होता. या स्फोटात पोलिसांनी तब्बल सहा महिन्यांनंतर तेथील मालकावर गुन्हा दाखल केला आहे. मालकाच्या हलगर्जीमुळे हा स्फोट झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

आरोपी मालक विजय जुगलकिशोर शाहूची (६२, सदर) उप्पलवाडी परिसरात बालाजी आईस फॅक्टरी आहे. ६ जानेवारी रोजी तेथे अमोनिया गॅसचे प्रमाण वाढून स्फोट झाला होता. त्यामुळे परिसरातदेखील वायूची गळती झाली होती व अनेकांना त्रास झाला होता. या स्फोटात जखमी झालेल्या डुग्गरसिंग रावत (७०, राजस्थान) व खुम्मनसिंग लुम्बसिंग (४५, राजस्थान) या कामगारांचा ६ व १० जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. तर श्रावणसिंग बघेल (४४, यशोधरानगर), व राजा राजेंद्र आर्य (२३, चिचोली, मध्यप्रदेश) हे जखमी झाले होते. कपिलनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. फॅक्टरीमध्ये अमोनिया गॅसवर नियंत्रण ठेवण्याची सक्षम यंत्रणाच नसल्याची बाब पोलिसांच्या तपासातून समोर आली. पोलिसांनी मालक जुगलकिशोर शाहूविरोधात भादंविच्या कलम २८५ व ३०४(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

स्फोटामुळे परिसरात झाली होती धावाधावया स्फोटानंतर टाकीतील अमोनिया गॅस १०० ते १५० चौरस फूट परिसरात पसरला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना डोळे चुरचुरणे, श्वास घेण्यात अडचण असे त्रास होऊ लागले होते. अग्निशमन दलाच्या पथकाने या परिसरातील उद्योगातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले होते. या प्रकरणात आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. मात्र सहा महिने साधा गुन्हादेखील दाखल झाला नसल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी