शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होणार!

By admin | Published: September 01, 2015 3:26 AM

शेडनेट, पॉलिहाऊस व औषधी वनस्पती लागवडीच्या नावाखाली शेतकऱ्यांना कर्जबाजारी करू न त्यांच्या जमिनी

नागपूर : शेडनेट, पॉलिहाऊस व औषधी वनस्पती लागवडीच्या नावाखाली शेतकऱ्यांना कर्जबाजारी करू न त्यांच्या जमिनी बँकेकडे गहाण करणाऱ्या मार्केटिंग कंपन्यांविरुद्ध आता गुन्हे दाखल होण्याची शक्यता बळावली आहे. आता या विषयात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: जातीने लक्ष घालून सोमवारी शेतकऱ्यांसह कृषी अधिकारी व बँक प्रतिनिधींची बैठक घेतली. यात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीवर तीव्र चिंता व्यक्त करू न संबंधित मार्केटिंग कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल झालाच पाहिजे, असे सांगितले. सोबतच या सर्व प्रकरणांची कृषी विभाग व शिखर बँकेने सविस्तर चौकशी करू न येत्या दहा दिवसात अहवाल सादर करा, असेही त्यांनी निर्देश दिल्याची माहिती आहे. या बैठकीला प्रामुख्याने भाजपच्या आमदार शोभाताई फडणवीस उपस्थित होत्या. दरम्यान त्यांनी औषधी वनस्पतीच्या नावाखाली मार्केटिंग कंपन्यांनी शेतकऱ्यांची कशाप्रकारे फसवणूक केली, याविषयी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. विशेष म्हणजे, यासंबंधी सर्वप्रथम ‘लोकमत’ने ‘शेतीवर आधुनिक दरोडा’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करू न शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला वाचा फोडली होती. पीक विम्याचा घोळ यावेळी कचारीसावंगा येथील ९३ शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विम्याचा लाभ मिळाला नसल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष मांडण्यात आली. संबंधित कृषी अधिकाऱ्यांच्या मते, या सर्व शेतकऱ्यांनी मागील वर्षी पीक विम्याचे पैसे बँकेकडे जमा केले. परंतु त्या पैशाचा चेक संबंधित विमा कंपनीपर्यंत पोहोचलाच नाही. त्यामुळे संबंधित विमा कंपनीने या सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असताना त्यांना अजूनपर्यंत नुकसान भरपाई दिलेली नाही. कृषी विभागाने संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधला असता, बँकेकडून त्यांना ९३ शेतकऱ्यांनी जमा केलेले पैसेच मिळाले नसल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली. मात्र यासंबंधी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली असता, त्यांनी हा संबंधित विमा कंपनी व बँकेमधील घोळ असून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका व्यक्त केली. तसेच यासाठी काटोल येथील उपविभागीय अधिकारी, संबंधित तालुका कृषी अधिकारी व बँक अधिकाऱ्याची एक समिती स्थापन करू न चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.