शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मी म्हातारा झालो नाही, सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'; शरद पवारांचा निर्धार
2
Maharashtra Election 2024: ठाकरे विरुद्ध शिंदे... विदर्भात कोणत्या शिवसेनेची डरकाळी? समजून घ्या गणित
3
“महाराष्ट्राची निवडणूक देशाचे भविष्य बदलणारी, मविआचे सरकार आणा”: मल्लिकार्जुन खरगे
4
जयश्री पाटील यांची बंडखोरी अन् उमेदवारी, विशाल पाटील-विश्वजित कदम आमनेसामने; कोण बाजी मारेल?
5
“मोदीसाहेब भाषणे देण्यात हुशार, पण शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकणार नाही”: शरद पवार
6
Video - दे दणादण! बसमध्ये कंडक्टर-प्रवाशामध्ये तुफान राडा; लाथाबुक्क्यांनी केली मारहाण
7
अजित पवारांना भाजपने उमेदवारासहित जागा का दिल्या? विनोद तावडेंनी सांगितलं कारण
8
"वारे उबाठा तुझं हिंदुत्व...! आरे आम्हाला सांगा, आम्ही बिनविरोध निडून देतो, पण..."; संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप
9
ओबीसी, दलितांचे आरक्षण कमी करुन ते मुस्लिमांना देण्याचा महाविकास आघाडीचा घाट - अमित शाह
10
बायको अन् लेकीविषयी बोलत होता वरुण धवन, तिकडे समंथाचा चेहराच पडला, Video व्हायरल
11
मविआतील मुख्यमंत्रीपदाचा दावेदार ठरला? शरद पवारांनी थेट फॉर्म्युला सांगितला, म्हणाले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'बेरोजगारांना ४ हजार रुपये देणार'; महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध केला
13
'बटोगे तो कटोगे',भाजपाच्या कार्यकर्त्यांने थेट लग्नपत्रिकेवरच सीएम योगींचा नारा छापला
14
कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अटकेत, दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूशी कनेक्शन
15
लाडक्या बहिणींना २१०० रुपये, २५ लाख नवीन नोकऱ्या...; भाजपच्या संकल्प पत्रात काय-काय?
16
बाबा सिद्दिकींवरील हल्ला फेल झाला असता तर पुण्यातील नेता होता टार्गेटवर; बिश्नोई गँगचा प्लॅन B
17
किशोरी गोडबोलेंच्या लेकीची कमाल! थेट ॲपलची ब्रँड अँबेसिडर बनली सई, पोस्ट व्हायरल
18
१९ वर्षांनी तो परत येतोय! मुकेश खन्नांनी शेअर केली 'शक्तिमान'ची पहिली झलक, पाहा व्हिडीओ
19
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, पवारांचंही नाव घेतलं!
20
"मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे काय राहता", अजित पवारांचं रामराजेंना आव्हान

सरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांचे जातप्रमाणपत्र ठरविले अवैध

By निशांत वानखेडे | Published: August 18, 2024 7:29 PM

जात पडताळणी समितीचा : गडचिराेली जिल्ह्याच्या काेरेगावचा प्रकार : गाेंड-गाेवारी समाजात असंताेष

नागपूर: अनुसूचित जाती-जमाती जात पडताळणी समितीने आदिवासी गाेंड गाेवारी जमातीच्या ५ ग्रामपंचायत सदस्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले आहेत. गडचिराेली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्याच्या काेरेगाव येथील सदस्यांसाेबत हा प्रकार झाला आहे. या निर्णयामुळे सरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व अवैध ठरण्याची शक्यता असून यामुळे आदिवासी गाेंड-गाेवारी समाजात प्रचंड असंताेष पसरला आहे.

देसाईगंज तालुक्यातील काेरेगाव हे गाेंड गाेवारी जातीचे प्राबल्य असलेले गाव आहे व येथील सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा समाजासाठी आरक्षित आहेत. यात हे उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले हाेते. त्यानंतर या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी जात पडताळणी समितीकडे अर्ज केला हाेता. या समितीने निर्णय घेत ५ सदस्यांची प्रकरणे अपात्र ठरविली आहेत.

यामध्ये काेरेगावच्या सरपंच कुंदा तुळशीराम वाघाडे यांच्यासह अशाेक वासुदेव राऊत, पुष्पा जगन दूधकुवर, डाकराम मोतीराम राऊत आणि दीपा वाघाडे या सदस्यांचा समावेश आहे. जात पडताळणी समितीच्या या निर्णयाने ग्रामपंचायतीची अर्धी टीम अपात्र ठरण्याची शक्यता आहे. प्रमाणपत्र अवैध ठरविलेल्या सर्व सदस्यांनी जात पडताळणी समितीच्या या निर्णयाविराेधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी रितसर याचिका टाकून निर्णयाला आव्हान दिले आहे. या निर्णयामुळे समाजातही प्रचंड असंताेष पसरत चालला आहे. राज्य सरकार गाेवारींच्या मूलभुत प्रश्नाबाबत वेळकाढू धाेरण राबवित असल्याने समाजाला या समस्यांना ताेंड द्यावे लागते, असा आराेप करीत गरीब समाजाने कधीपर्यंत न्यायालयात लढावे, असा सवाल आदिवासी गाेंड गाेवारी समाज संघटनेने केला आहे.

वडणे समितीच्या अहवालापूर्वी निर्णयाने आश्चर्य४४ एप्रिल १९८५ च्या शासन निर्णयात गाेंड गाेवारीबाबत नमूद असलेली चुकीची माहिती दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी आदिवासी गाेंड गाेवारी संघटनेतर्फे २६ जानेवारी २०२४ पासून सुरू झालेले आमरण उपाेषण व ५ फेब्रुवारी राेजी लाखाेंच्या संख्येने उपस्थित राहून समाज बांधवांनी आंदाेलन केले हाेते. त्यामुळे राज्य सरकारने आदिवासी गाेंड गाेवारी जमातीच्या अभ्यासासाठी निवृत्त न्यायमूर्ती वडणे यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन केली हाेती व ६ महिन्यात अहवाल सादर विश्वास दिला हाेता. मात्र वडणे समितीने अद्याप आपला अहवाल सादर केला नाही. असे असताना जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आता असंताेषाचा भडका उडणार

गाेंड गाेवारी जमातीच्या अभ्यासासाठी राज्य सरकारद्वारे स्थापित न्या. वडणे समितीचा अहवाल येईपर्यंत जात पडताळणी समितीने हा निर्णय थांबवायला हवा हाेता. मात्र कुणाच्यातरी दबावामुळे जात पडताळणी समिती आकस ठेवून गाेंड गाेवारी जमातीच्या लाेकांवी अन्याय करीत आहे. गरीब गाेवारी कधीपर्यंत न्यायालयाची लढाई लढावी? गाेंड गाेवारी समाजाच्या सहनशीलतेचा बांध फुटत चालला आहे. या निर्णयाबाबत लवकरच समाजाची बैठक हाेईल. समाजाच्या असंताेषाचा भडका उडेल, ५ फेब्रुवारीपेक्षा दुप्पट संख्येने गाेंड गाेवारी समाज लवकरच नागपुरात जमा हाेईल व या असंताेषाला सरकारच जबाबदार राहिल.- कैलाश राऊत, अध्यक्ष, आदिवासी गाेंड गाेवारी संघटना, महाराष्ट्र

 

टॅग्स :nagpurनागपूर