लोकमत न्यून नेटवर्कनागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने सुपारी व्यावसायिकांवर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. गुरुवारी एका व्यावसायिकाकडून ११.५० लाख रुपयांची निकृष्ट दर्जाची सुपारी जप्त केली. विभागाने बुधवारी दोन व्यावसायिकांकडून २० लाख रुपयांची सुपारी जप्त केली होती, हे विशेष.विभागाला प्राप्त माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी विनोद धवड आणि प्रफुल टोपले यांनी कळमना भरतनगर येथील पूर्व औद्योगिक परिसरातील सत्यप्रकाश राजाराम मौर्य यांच्या मालकीच्या एस.एम. ट्रेडर्स या प्रतिष्ठानाची सखोल तपासणी केली. तपासणीअंती विक्रीसाठी साठविलेल्या सुपारीच्या साठ्यातून नमुना घेऊन ११ लाख ५१ हजार ६४० रुपये किमतीच्या ६३९८ किलो सुपारीचा साठा असुरक्षित आणि कमी दर्जाच्या संशयावरून जप्त केला.ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नागपूर विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शहरचे सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकाºयांनी केली. जनआरोग्याचा विचार करता या प्रकारची धडक मोहीम या पुढेही सुरू राहील, असे केकरे यांनी म्हटले आहे.
पुन्हा पकडली सुपारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 1:37 AM
अन्न व औषध प्रशासन विभागाने सुपारी व्यावसायिकांवर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. गुरुवारी एका व्यावसायिकाकडून ११.५० लाख रुपयांची निकृष्ट दर्जाची सुपारी जप्त केली.
ठळक मुद्दे११.५१ लाखांचा निकृष्ट माल जप्त : एफडीएचा दणका