नरखेड/माेवाड : पाेलिसांनी माेवाड (ता. नरखेड) शिवारात कारवाई करीत गुरांची अवैध वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन पकडले. यात दाेघांविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यांच्याकडून ४ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. १२) रात्री करण्यात आली.
नरखेड पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना माेवाड शिवारातून गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या शिवारातील पाहणी केली. त्यांना एमपी-२८/जी-४२८७ आढळून येताच त्यांनी हे वाहन थांबवून झडती घेतली. त्यात त्यांना चार जनावरे काेंबली असल्याचे निदर्शनास आले. चाैकशीअंती ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेता. त्यांनी सुरेंद्र आमलाल मरसकाेल्हे, रा. परताला, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश व हमीद महबूब खान, रा. काेरबा, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश या दाेघांविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यांच्याकडून चार लाख रुपये किमतीचे वाहन आणि ६० हजार रुपये किमतीची जनावरे असा एकूण ४ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेचा तपास पाेलीस हवालदार मनाेज गाढवे करीत आहेत.