लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : पाेलिसांनी माेहदी (दळवी)-सावरगाव मार्गावर केलेल्या कारवाईमध्ये गुरांच्या अवैध वाहतुकीचा ट्रक पकडला. त्यात ट्रकचालकासह चाैघांना अटक करण्यात आली असून, ट्रकमधील १९ म्हशी व १८ रेडे अशा ३६ जनावरांची सुटका करण्यात आली. या कारवाईत जनावरांसह ३२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि.१४) मध्यरात्री ३.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये इरफान शेर खान पठाण (२१, रा. खानपूर, ता. जि. ओरिया, उत्तर प्रदेश), जहीर अब्दुल गनी खान (२४), रूपेश मतलाल बिलेन (२०) दाेन्ही रा. लालबर्गा, जि. बालाघाट, मध्य प्रदेश व फरदीन खान जलाल खान (२०, रा. जाजमहू केडीके चाैक, मक्का मशिदीजवळ, कानपूर) यांचा समावेश आहे.
नरखेड ठाण्याचे पाेलीस पथक गस्तीवर असताना, मध्य प्रदेशातून माेहदी (दळवी)- नरखेडमार्गे यूपी-७९/टी-२३९५ क्रमांकाचा दहाचाकी ट्रक जाताना आढळून आला. पाेलिसांना संशय आल्याने ट्रकला थांबवून पाहणी केली असता, ट्रकमध्ये १९ म्हशी व १७ रेडे अशा ३६ काेंबल्याचे आढळून आले. या गुरांची अवैधरीत्या कत्तलखान्याकडे वाहतूक केली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी सर्व जनावरांची सुटका करीत आराेपींना ताब्यात घेत अटक केली. सर्व गुरांना नरखेड येथील अमृत गाेरक्षण केंद्रात पाठविण्यात आले. या कारवाईत ३६ जनावरे व ट्रक असा एकूण ३२ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पाेलीस निरीक्षक जयपालसिंग गिरासे यांनी दिली.
याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी आराेपींविरुद्ध कलम ११ (१)(ड) प्राण्यांना निर्दयतेने वागणूक कायदा सहकलम ८३, १७७ मोटार वाहतूक कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, चाैघांना अटक केली आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे, मनीष साेनाेने, दिगांबर राठोड, अक्षय ठाकरे, गौरव बखाल, राहुल धिमान, होमगार्ड जवान गौरव रेवतकर, भूषण लेंडे, याेगेश नासरे, क्षीरसागर यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.