पांढुर्णा (मध्यप्रदेश) येथून नागपूरच्या दिशेने गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. दरम्यान, आरजे-१४/जेई-३०७५ क्रमांकाच्या कंटेनर चालकाने पाेलिसांना पाहताच कंटेनर मध्येच थांबविला व कंटेनर साेडून पळ काढला. पाेलिसांनी पाठलाग करून मुस्तकीन कल्लू खाँ (२३, रा. भाैराेसा, ता. बैरसिया, जिल्हा भाेपाळ, मध्यप्रदेश) यास ताब्यात घेतले असून, आमीर खान, रा. जिन्सी चाैक, जहागिराबाद, भाेपाळ, मध्यप्रदेश व असलम, रा. माेहगाव, ता. साैंसर, जिल्हा छिंदवाडा, मध्यप्रदेश हे दाेघे पळून गेले.
या कारवाईमध्ये १८ लाख रुपये किमतीचा कंटेनर व ६ लाख ५ हजार रुपये किमतीची ४३ जनावरे, असा एकूण २४ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व जनावरांना नजीकच्या गाेरक्षणमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती प्रभारी ठाणेदार मारुती मुळूक यांनी दिली. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक अर्जुुन राठाेड, रवींद्र चटप, सचिन येळकर, धाेंडूतात्या देवकते, श्रीधर कुळकर्णी, गुणेश्वर डाखाेळे यांच्या पथकाने केली.