लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : पाेलिसांनी सावनेर-खापा मार्गावरील पुलाजवळ केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा टिप्पर पकडला. त्यात दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २० लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. २०) रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
शेख वकील शेख हबीब (३५, रा. चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती) व माेहम्मद वासिम शेख हकीम (२५, रा. तिवसा, जिल्हा अमरावती) अशी अटक करण्यात आलेले आराेपी टिप्परचालक व क्लिनरची नावे आहेत.
सावनेर पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना सावनेर-खापा (ता. सावनेर) मार्गावर रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या मार्गावरील सावनेरनजीकच्या पुलाजवळ नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली.
या पाेलिसांच्या पथकाने एमएच-२७/बीएक्स-७८९० क्रमांकाचा टिप्पर थांबवून झडती घेतली असता, त्यात रेती असल्याचे आढळून येताच कागदपत्रांची तपासणी केली. दरम्यान, ती रेतीची विना राॅयल्टी उचल व वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी टिप्परमधील दाेघांना ताब्यात घेत अटक केली आणि त्यांच्याकडून २० लाख रुपयांचा टिप्पर व २४ हजार रुपयांची आठ ब्रास रेती असा एकूण २० लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार मारुती मुळूक यांनी दिली.
याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक वांढरे करीत आहेत.