लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि. ५) खापा (ता. सावनेर) परिसरात केलेल्या कारवाईमध्ये दारूची अवैध वाहतूक करणारी कार पकडली. त्यात दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून देशीदारूच्या पेट्रूा आणि कार असा एकूण २ लाख २४ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रविवारी सायंकाळी खापा परिसरात गस्तीवर हाेते. त्यांना खापा परिसरातून दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या भागातील वनविभागाच्या नाक्याजवळ एमएच-३१/सीएम-५५६९ क्रमांकाची कार थांबवून झडती घेतली. त्या कारमध्ये पाेलिसांना देशीदारूच्या पाच पेट्या आढळून आल्या. ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी कारमधील विशाल शंभू मंडल (२१, रा. चनकापूर, ता. सावनेर) व धीरज दिलीप सारे (२७, रा. दहेगाव रंगारी, ता. सावनेर) या दाेघांना ताब्यात घेत अटक केली.
या कारवाईमध्ये २ लाख १० हजार रुपयांची कार आणि १४ हजार ४०० रुपये किमतीची देशीदारू असा एकूण २ लाख २४ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. याप्रकरणी खापा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पाेलीस नायक राजू रेवतकर, किशाेर वानखेडे, आशिष मुंगळे यांच्या पथकाने केली.