लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : परिसर रेतीसाेबतच काेळशाच्या चाेरीसाठीही कुप्रसिद्ध आहे. उपविभागीय पाेलीस अधिकारी मुख्तार बागवान यांच्या पथकाने साेमवारी (दि. १७) काेळशाची चाेरटी वाहतूक करणारा ट्रक पकडल्यानंतर त्यांच्या पथकाने बुधवारी (दि. १९) मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास गाेंडेगाव (ता. पारशिवनी) परिसरात कारवाई करीत चाेरीचा काेळसा वाहून नेणारा ट्रक पकडला. यात दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून काेळसा व ट्रक असा एकूण ३ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये ट्रकचालक बालचंद हरिराम बेलोने (५६) व उमेश पाणतावने (४६, दाेघेही रा. कांद्री, ता. पारशिवनी) या दाेघांना समावेश आहे. विशेष म्हणजे, उमेशला यापूर्वी करणत आलेल्या काेळसा चाेरीच्या कारवाईतही अटक करण्यात आली हाेती. एसडीपीओ मुख्तार बागवान यांचे पथक गाेंडेगाव परिसरात गस्तीवर असताना त्यांना या भागात काेेळशाची चाेरी केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी पाहणी केली असताना त्यांना ट्रकमध्ये (एमएच-४०/४७१६) काेळसा भरला जात असल्याचे आढळून आले.
पाेलिसांना पाहताच काेळसा भरणाऱ्या कामगारांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. ट्रकचालक बालचंद बेलोने व उमेश पाणतावने याच्याकडे काेळसा वाहतुकीची बिल्टी अथवा वेकाेलीची गेटपास नसल्याचे स्पष्ट हाेताच त्यांनी दाेघांनाही अटक केली. या कारवाईत त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा ट्रक आणि २५ हजार रुपयांचा पाच टन काेळसा असा एकूण ३ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पाेलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांनी दिली. याप्रकरणी कन्हान (ता. पारशिवनी) पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक यशवंत कदम, विक्की कोथरे, खुशाल रामटेके, मंगेश ढबाले, जैलाल सहारे, वीरेंद्रसिंग चौधरी यांच्या पथकाने केली.
===Photopath===
190521\5020img-20210519-wa0233.jpg
===Caption===
जप्त केलेला ट्रक