लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : पाेलिसांच्या पथकाने पालाेरा (ता. पारशिवनी) शिवारात शनिवारी (दि. ४) सकाळी ११ वाजताच्या सुमारास केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन पकडले. यात दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकूण २ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पारशिवनी भागातून गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती प्राप्त हाेताच पाेलिसांनी पालाेरा शिवाराची पाहणी केली. तिथे त्यांना एमएच-४०/डीएस-१६६७ क्रमांकाचे वाहन जाताना दिसले. संशय आल्याने पाेलिसांनी ते वाहन थांबवून झडती घेतली. त्यांना त्या वाहनात सहा जनावरे काेंबली असल्याचे आढळून आले. चाैकशीदरम्यान ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे तसेच ती सर्व जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पाेलिसांनी वाहनातील सर्व जनावरांची सुटका करून वाहन जप्त केले. त्या जनावरांना नजीकच्या गाेरक्षणमध्ये पाठविण्याची व्यवस्थाही पाेलिसांनी केली.
या कारवाईमध्ये दाेन लाख रुपयांचे वाहन व ४५ हजार रुपये किमतीची जनावरे असा एकूण २ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिवाय, मिलन विजयशंकर तिवारी (४७, रा. मनसर, ता. रामटेक) व मनाेज फुलचंद राऊत (२८, रा. पेठ परसाेडी) यांच्या विराेधात गुन्हा नाेंदविण्यात आल्याची माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक पळनाटे करीत आहेत.