लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात विविध भागात पावसाळ्याच्या दिवसात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. केवळ ४० दिवसात ८ सर्पदंशाच्या घटना घडल्या. त्यातील दोघांना जीव गमवावा लागला. यात १० वर्षाचा मुलासह एका ३५ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.
जाणकारांच्या माहितीनुसार, विदर्भासह नागपूर जिल्ह्यात नाग (कोबरा), मण्यार, घोणस (वायपर) आणि फुरसे यासारखे अतिविषारी साप निघतात. जून महिन्यानंतर पाऊस आल्यावर बिळात पाणी शिरते. यामुळे साप बाहेर पडतात. आश्रयासाठी ते अंगणात, घरातही प्रवेश करतात. यामुळे अंगण आणि घर स्वच्छ ठेवण्याचा सल्ला सर्पमित्रांनी दिला आहे. अंगणात सापाला लपण्यासारखी जागा असल्यास ते अधिक धोकादायक असते. असा प्रकार घडलाच तर तात्काळ सर्पमित्रांना पाचारण करण्याचा सल्ला दिला जात आहे.
...
अशा घडल्या घटना
नाव - दिवस - उपचार
१) राणी विश्वकर्मा (२८) कळमना - १५ जुलै - मेयो
२) आदर्श मिश्रा (१०) भरतवाडा- २९ जुलै - खासगी
३ ) सचिन राऊत (२८) उमरेड - १० ऑगस्ट - मेडिकल
४) जनार्दन भक्ते (४२) टाकळघाट- ११ ऑगस्ट - मेडिकल
५) विक्की कामडे (२२) .. - १६ ऑगस्ट - मेडिकल
६) इंदूबाई मुनघाटे (६०) उमरेड - २४ ऑगस्ट - मेडिकल
७) शौकत कुरेशी (६३) कळमना- २४ ऑगस्ट - मेयो
८) कोमल उईके (३५) सुरेंद्रगड- २४ ऑगस्ट - मेडिकल
...
साप निघाल्यास काय कराल?
सापाला मारण्याऐवजी सर्पमित्राला सूचना द्या.
साप निघालेल्या ठिकाणी उजेडाची व्यवस्था करा.
सर्पदंश झाल्यास तोंडावाटे विष ओढू नका.
तातडीने जवळच्या सरकारी दवाखान्यात रुग्णाला न्या.
...
सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक
नितीश भांदककर -७९७२६४६९०९
प्रीतम कारोंडे- ७५०७८९१९७८
अमोल कोठे-८८८८३४४१८८
अंकित खलोडे -९८३४४५४३६८
गौरांग वाईकर- ९९७००९९९१०
...