रामटेक : शहरात काेराेना रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसून येत असले तरी अजूनही धाेका टळला नाही. ही बाब लक्षात घेत मंगळवारी रामटेक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे काेविड चाचणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले. यात १०० वर नागरिकांची काेविड तपासणी करण्यात आली.
तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या मार्गदर्शनात आराेग्य विभागाच्या सहकार्यातून हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात किरकाेळ विक्रेते, अडतिया, वाहनचालक, ऑटाेचालक, भाजीपाला उत्पादक शेतकरी व विक्रेते आदींची काेविड चाचणी केली गेली. शहरातील बसस्थानक चाैकात सुद्धा ही माेहीम राबविण्यात आली. यावेळी १०० पेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. शहरात ही माेहीम आणखी दाेन दिवस सुरू राहणार असून, नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी केले आहे.