कुही : स्थानिक ग्रामीण रुग्णालय येथे काेविशिल्ड लसीकरण माेहिमेला साेमवारी प्रारंभ झाला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. एस. मडावी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय निकम यांच्या नेतृत्वात लसीकरणाचे नियोजन आखण्यात आले होते. पहिल्या दिवशी ९२ आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
कुही येथे पहिली लस आशा वर्करच्या गटप्रवर्तक अलका भाेयर यांना दिल्या गेली. तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात ५१० व्यक्तींसाठी १,१२० डोस आलेले आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसानंतर दुसरा डोस प्रत्येकाला घ्यावा लागणार आहे. आठवड्यातून चार दिवस लसीकरणाचे असून, आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आल्याची माहिती डॉ. एम. एस. मडावी यांनी दिली. याप्रसंगी सभापती अश्विनी शिवणकर, उपसभापती वामन श्रीरामे, जि. प. सदस्य प्रमिला दंडारे, तहसीलदार बाबाराव तिनघसे, गटविकास अधिकारी मनोज हिरुडकर, बालविकास प्रकल्प अधिकारी गजभिये आदींची उपस्थिती होती. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी. आर. पाटील, डॉ. एम. एस. मडावी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय निकम, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजभे, डॉ. रामटेके, डॉ. रचना नागदेवे, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आदींनी सहकार्य केले.