शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

‘पेसो’च्या अधिकाऱ्यांवर ‘सीबीआय’चा ‘हंटर’, १० लाखांची लाच घेताना चौघांना अटक

By योगेश पांडे | Published: January 04, 2024 6:16 PM

याची पाळेमुळे खोलवर असल्याची शंका घेण्यात येत आहे

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: राजस्थानच्या एका केमिकल कंपनीला अतिरिक्त डेटोनेटर्स बनविण्याची परवानगी देण्यासाठी १० लाखांची लाच घेणाऱ्या ‘पेसो’च्या (पेट्रोलिअम ॲंड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन) दोन अधिकाऱ्यांना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधिक पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासह लाच देणारा राजस्थानच्या कंपनीचा संचालक व एक बाहेरील व्यक्तीदेखील जाळ्यात अडकला आहे. या कारवाईमुळे ‘पेसो’त खळबळ उडाली असून याची पाळेमुळे खोलवर असल्याची शंका घेण्यात येत आहे.

‘पेसो’चे देशातील मुख्यालय नागपुरात आहे. येथे मुख्य नियंत्रकासह उपमुख्य नियंत्रक दर्जाचे अधिकारी असतात. या कार्यालयातून देशभरातील स्फोटके निर्माण करणाऱ्या कंपन्यांना परवाने दिले जातात आणि कंपन्यांतील उत्पादनावरही लक्षदेखील ठेवले जाते. राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यातील सूपर शिवशक्ती केमिकल्स प्रा.लि. या कंपनीचे संचालक देविसिंग कच्छवाह याच्या कामासाठी झेरॉक्स दुकानाचा मालक प्रियदर्शन दिनकर देशपांडे (रा. लेक व्ह्यूव अपार्टमेंट, लक्ष्मीनगर) याने पैसे घेतल्याची माहिती सीबीआयला मिळाली. संबंधित कंपनीला मार्च २०२४ पर्यंत त्यांच्या डेटोनेटर्स उत्पादनाची क्षमता ७५ टक्क्यांपर्यंत वापरायची होती. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगीसाठी ‘पेसो’च्या दोन अधिकाऱ्यांनी १० लाखांच्या लाचेची मागणी केली होती. हा व्यवहार देशपांडेच्या माध्यमातून होणार होता. संबंधित कंपनीच्या परवान्यांमध्ये बदलाचे कामदेखील देशपांडेच्या माध्यमातून पैसे घेऊनच झाले होते. १ जानेवारी रोजी कच्छवाह किसनगड विमानतळावरून नागपुरात पोहोचल्यावर देशपांडेशी भेट झाली. त्यानंतर दोघांनीही ‘पेसो’च्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. देशपांडेच्या दुकानातच पैसे देण्याचे निश्चित झाले. सीबीआयला याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर सापळा रचण्यात आला व पैसे घेताना आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. सीबीआयने चौघांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

- सव्वादोन कोटींची रक्कम जप्तसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयच्या पथकाने देशपांडे तसेच ‘पेसो’च्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली. त्यात देशपांडेच्या घरातून सव्वा कोटी तर एका अधिकाऱ्याच्या घरातून ९० लाख रुपये जप्त करण्यात आले. याशिवाय लाचेची १० लाखांची रक्कमदेखील जप्त करण्यात आली आहे. सीबीआयचे उपमहानिरीक्षक एम.एस. खान यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

- देशपांडे लाचेच्या रॅकेटचा ‘पॉईंट पर्सन’गेल्या काही वर्षांपासून पेसो कार्यालयातील दोन अधिकारी स्फोटके निर्माण करणाऱ्या कंपन्याना कारवाईची भीती दाखवून तसेच स्फोटक निर्मितीचे परवाने रद्द करण्याचा धाक दाखवून लाखो रुपयांची लाच घेत होते. याबाबत नागपूर सीबीआय कार्यालयाला माहिती मिळाल्यानंतर चौकशी करण्यात आली. चौकशीअंती यात प्रियदर्शन दिनकर देशपांडे (रा. लेक व्ह्यूव अपार्टमेंट, लक्ष्मीनगर) याचा मोठा हात असल्याची बाब समोर आली. त्याचे सेमीनरी हिल्समधील ‘पेसो’ कार्यालयाजवळ झेरॉक्स सेंटर आहे. तो देशभरातील स्फोटके निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क करून अधिकाऱ्यांसाठी लाचेच्या स्वरुपात पैसे गोळा करतो असे तपासातून समोर आले.

टॅग्स :Arrestअटक