शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने शनिवारी सकाळी छापा घातला. तब्बल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने शनिवारी सकाळी छापा घातला. तब्बल दहा तास चौकशी केल्यानंतर हे पथक देशमुख यांच्या निवासस्थानातून निघून गेले.

शनिवारी सकाळी ७.३० ते ७.४५च्या सुमारास इनोव्हा आणि आर्टिका अशा दोन गाड्यांमधून सीबीआयचे पथक देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी दाखल झाले. पीपीई किट घालून असलेल्या या पथकात २ महिलांसह १० अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यांनी देशमुखांना आपली ओळख सांगून चौकशीसाठी आल्याची माहिती दिली. यावेळी देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांसह सहा ते आठ जण नाश्ता करण्याच्या तयारीत होते. त्या सर्वांचे मोबाइल फोन ताब्यात घेण्यात आले. प्रारंभी या पथकाने देशमुख यांच्या निवासस्थानाचा कानाकोपरा तपासला. कपाट लोकर आदींची तपासणी केल्यानंतर काही कागदपत्रे ताब्यात घेतली. त्याची पाहणी केल्यानंतर या पथकाचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांनी माजी गृहमंत्री देशमुख यांची प्रदीर्घ विचारपूस वजा चौकशी केली.

विशेष म्हणजे, निवासस्थानी पोहोचल्यानंतर स्थानिक पोलिसांना सीबीआयकडून साधी सूचनाही देण्यात आली नाही. त्यामुळे सकाळी ९ वाजेपर्यंत देशमुख यांचे निवास स्थान ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते ते सीताबर्डी पोलीसही या कारवाईपासून अनभिज्ञ होते. दरम्यान, देशमुख यांच्या निवासस्थानात पीपीई किट घालून गेलेले सीबीआयचे पथक असल्याचे लक्षात आल्यानंतर, तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली. त्यांनी आपल्या वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर, सीताबर्डीचा पोलीस ताफा देशमुख यांच्या निवासस्थान समोर पोहोचला.

---

नेमके काय कळेचना!

सीबीआयच्या पथकात नेमके कुठले अधिकारी आहेत, ते १० तासांनंतरही स्पष्ट झाले नव्हते.

आयजी आणि एडीजी दर्जाचे तीन वरिष्ठ अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह देशमुख यांच्या निवासस्थानी चौकशी करीत असल्याचे सांगितले जात होते. त्यांनी जाण्यापूर्वी निवासस्थानातील देशमुख यांचे कार्यालय सील केले होते.

----

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी

या कारवाईने शहरात एकच खळबळ उडवून दिली. दुपारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जितेंद्र तिवारी आणि महिला नेत्या नूतन रेवतकर आपल्या कार्यकर्त्यांसह देशमुख यांच्या निवासस्थानासमोर आल्या. त्यांनी येथे सीबीआयच्या कारवाईचा जोरदार निषेध नोंदविला. केंद्र सरकार आणि अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी आणि राज्यात सत्तेवर येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील लोकांच्या मदतीने कट कारस्थान करून, सीबीआयची कारवाई करून घेतल्याचा आरोप या नेत्यांनी केला. सुमारे वीस मिनिटे त्यांनी येथे घोषणाबाजी केल्यानंतर, सीताबर्डीचे ठाणेदार अतुल सबनीस द्वितीय निरीक्षक काचोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतले.

----

उलट-सुलट चर्चा

देशमुख यांच्या निवासस्थानाच्या आतमध्ये नेमकं काय सुरू आहे, हे निवासस्थानाच्या समोर असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहीत नव्हते. मात्र, दिल्ली, मुंबईचा हवाला देऊन काही वृत्तवाहिन्यांनी वेगवेगळे वृत्त दिल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

-----

किट घातलेला एक अधिकारी बाहेर आला. त्याने त्यांच्या एका कारमधून कागदपत्रांचा गठ्ठा तर दुसऱ्या कारमधून अन्य साहित्य बाहेर काढले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांनी त्यांना गराडा घातला. मात्र, त्यांना कसलाही प्रतिसाद न देता, हा अधिकारी पाच मिनिटांत बाहेरून आतमध्ये गेला.

---

सोशल मीडियाचा गोंधळ

सोशल मीडियावर देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला, त्यांना ताब्यात घेतले, मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त केली, असे उलटसुलट मेसेज वायरल होत होते. मात्र, सीबीआयचे पथक देशमुखांच्या निवासस्थानातून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्याकडे त्यांनी सोबत नेलेल्या कागदपत्राचा गठ्ठा आणि एक प्रिंटर, तसेच त्यांचे लॅपटॉप होते.

-----

सीबीआयचे अधिकारी सायंकाळी बाहेर येताच, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला आणि काही प्रश्न केले. मात्र, कोणतीही कॉमेंट न करता, हे पथक तेथून निघून गेले.

----

देशमुख यांची प्रतिक्रिया

सीबीआयचे पथक सर्चिंगसाठी आमच्याकडे आले होते. त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य केले. आता मी माझ्या काटोल मतदार संघात कोविडची रुग्णांची स्थिती कशी आहे, ते बघण्यासाठी दौऱ्यावर जात आहे, अशी मोजकी प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली. पत्रकारांच्या प्रश्नावर बोलण्याचे त्यांनी टाळले.