आशिष दुबे
नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) च्या दहावी व बारावीच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन यावरून विद्यार्थी, पालक संभ्रमात होते. यासंदर्भात सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी स्पष्ट केले की बोर्डाच्या परीक्षा पूर्वीप्रमाणेच लेखी होती. त्यासाठी तयारी सुरू केली आहे.
लोकमत सोबत बोलताना भारद्वाज म्हणाले की ऑनलाईन परीक्षा स्पर्धा व अन्य प्रवेश परीक्षेपुरता मर्यादित आहे. पण बोर्डाची ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नाही. शिक्षणाच्या अनेक उद्देशापैकी एक उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य देखील महत्त्वाचे आहे. ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य जाणून घेणे शक्य नाही. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. दुसरे आणखी कारण म्हणजे आपल्याकडे ऑनलाईन परीक्षेसाठी इन्फ्रास्ट्रक्टर सुद्धा नाही. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेचे आयोजन विद्यार्थी हिताय नाही. ते म्हणाले की विद्यार्थी कुठल्याही तणावात येऊ नये म्हणून अभ्यासक्रमात ३० टक्के कपात केली आहे. सीबीएसईच्या विषय तज्ञांनी विद्यार्थ्यांच्या अनुरुप अभ्यासक्रमात कपात केली आहे. सीबीएसईच्या निर्णयानंतरच देशातील अन्य राज्यांनी अभ्यासक्रम कमी केला आहे.
- शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय नाही
राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सीबीएसईने असे कुठलेही निर्देश शाळांना दिले नाही. भारद्वाज म्हणाले की ज्या राज्यांनी शाळांना परवानगी दिली आहे. तेथील पालकांनी शाळांचे निरीक्षण करावे. त्यानंतरच ठरवावे की मुलांना शाळेत पाठवायचे की नाही.
- ऑनलाईन शिक्षण काहींसाठी उपयुक्त
कोरोना संक्रमणामुळे काही शाळेने ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवले. हे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी किती प्रभावी असल्याचे विचारले असता ते म्हणाले की, ऑनलाईन शिक्षण काही विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे पण काहींसाठी नाही. हे शिक्षण विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे, की ते किती गांभीर्याने अध्ययन करतात. प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता सारखी नसते.