लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीबीएससी शाळा प्रशासनातील हिटलरशाही भूमिकेमुळे त्रस्त असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जलद व योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सीबीएसई शाळा प्राधिकरण लवकरच स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
सीबीएसई स्कूल स्टाफ वेलफेअर असोसिएशनच्या सदस्यांनी नाना पटोले यांची भेट घेऊन सीबीएसई शाळेतील शिक्षकांच्या समस्येबाबत अवगत केले. शाळा प्रशासनाकडून होत असलेला त्रास लक्षात आणून दिला. सोबतच सीबीएसई शाळा प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी केली. त्या मागणीला पटोले यांनी दुजोरा दिला. येत्या हिवाळी अधिवेशनात सीबीएसई शाळा प्राधिकरणाचा कायदा लागू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी संघटनेच्या अध्यक्ष दीपाली डबली, शिक्षण उपसंचालक अनिल पारधी उपस्थित होते.