लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रोडरोमियोबाबत नागरिकांच्या तक्रारी तसेच असामाजिक तत्त्वांना आळा घालण्यासाठी शहरातील उद्याने व क्रीडा मैदानात टॉवर उभारून सीसीटीव्ही कॅ मेरे लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी महापालिकेच्या हनुमाननगर झोन कार्यालयात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात दिले. शहरातील क्रीडांगण व उद्यानांचा विकास केला जात आहे. यात सीसीटीव्हींचाही समावेश करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.जनसंवादात नाल्यावरील भिंती, भूखंडांचे आरएल पत्र, अवैध मोबाईल टॉवर, पाण्याची पाईपलाईन टाकणे, अस्वच्छता, म्हाडा गाळेधारकांच्या समस्या, रस्त्यावरील पथदिवे, वाढीव मालमत्ता कर, नळजोडणी, रस्ते अशा स्वरुपाच्या तक्रारी करण्यात आल्या. जदसंवाद कार्यक्रमात नागरिकांच्या ८० तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यात आला. व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, सभापती रूपाली ठाकूर, नगरसेवक सतीश होले, दीपक चौधरी, भगवान मेंढे, आयुक्त अभिजित बांगर, अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी तसेच नगरसेवक व अधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्याने व क्रीडा मैदानात सीसीटीव्ही लावा; चंद्रशेखर बावनकुळे यांचे जनसंवादमध्ये निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:03 PM
रोडरोमियोबाबत नागरिकांच्या तक्रारी तसेच असामाजिक तत्त्वांना आळा घालण्यासाठी शहरातील उद्याने व क्रीडा मैदानात टॉवर उभारून सीसीटीव्ही कॅ मेरे लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी महापालिकेच्या हनुमाननगर झोन कार्यालयात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात दिले.
ठळक मुद्देसहायक आयुक्तांच्या पत्राशिवाय मोबाईल टॉवरला वीज नाही