नागपूर : सर्वत्र दिवाळीचा उत्सव सुरू असून लोक खरेदी करण्यात मग्न आहेत. अशावेळी श्री शिवम आणि भारत विकास परिषदेने १५० मुलांसह दिवाळी साजरी करून एक आदर्श निर्माण केला आहे.गरिबीमुळे सण साजरा करण्यास आणि वस्तू खरेदी करण्यापासून वंचित असणाºया मुलांसाठी ‘दिवाळी बस्ता’ सर्व मुलांना वितरित करण्यात आला. शिवाय श्री शिवम मॉलने मुलांना त्यांच्या पसंतीनुसार खरेदीची संधी दिली. सोबतच मिठाई आणि स्नॅक्सचे वितरण करण्यात आले. यावेळी मुलांनी आनंद लुटला आणि नृत्य सादर केले. श्री शिवम व संपूर्ण कर्मचाºयांनी गरजू मुलांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी आ. सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, जयप्रकाश गुप्ता, श्री शिवमचे संचालक गोपाल मंत्री आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. सोबतच भारत विकास परिषदेने मुलांना फटाके आणि आवश्यक वस्तू दिल्या. गरजू मुलांना दिवाळी साजरी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. (वा.प्र.)
१५० गरजू मुलांसोबत दिवाळी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 1:09 AM
सर्वत्र दिवाळीचा उत्सव सुरू असून लोक खरेदी करण्यात मग्न आहेत. अशावेळी श्री शिवम आणि भारत विकास परिषदेने १५० मुलांसह दिवाळी साजरी करून एक आदर्श निर्माण केला आहे.
ठळक मुद्देश्री शिवम व भारत विकास परिषद : मुलांना मोफत शॉपिंगची संधी