लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’मुळे देशातील सण व उत्सवांनादेखील फटका बसतो आहे. बुधवारी हनुमान जयंती असून नागरिकांनी घराबाहेर न निघता घरूनच हनुमंताची आराधना करावी. या आजाराची गंभीरता लक्षात घेता नागरिकांनी ‘लॉकडाऊन’चे पूर्णत: पालन करावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आले आहे.यासंदर्भात ‘विहिंप’चे प्रांतमंत्री गोविंद शेंडे यांनी पत्रक जारी केले आहे. बजरंग दल व ‘विहिंप’तर्फे दरवर्षी हनुमान जयंती उत्साहाने साजरी करण्यात येते. यावर्षीदेखील हाच उत्साह कायम ठेवण्याचा संकल्प घेण्यात आला होता. परंतु ‘कोरोना’मुळे सर्व कार्यकर्त्यांना घरीच हनुमान जयंती साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सकाळी ७ ते १२ या दरम्यान अकरा वेळा हनुमान चालिसा किंवा मारुतीस्तोत्राचे पठण करावे. या माध्यमातून ‘कोरोना’पासून मुक्तीसाठी प्रार्थना करावी, असे आवाहन शेंडे यांनी केले. नागरिकांनीदेखील ‘लॉकडाऊन’चे पूर्णत: पालन करावे व घरूनच पूजा करावी, असे त्यांनी सांगितले.
हनुमान जयंती घरीच साजरी करा; ‘विहिंप’चे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 1:55 PM
बुधवारी हनुमान जयंती असून नागरिकांनी घराबाहेर न निघता घरूनच हनुमंताची आराधना करावी. या आजाराची गंभीरता लक्षात घेता नागरिकांनी ‘लॉकडाऊन’चे पूर्णत: पालन करावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे‘लॉकडाऊन’चे पालन करा