शहरं
Join us  
Trending Stories
1
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत सत्तेत आलो असं छगन भुजबळ म्हणाले"; पुस्तकात खळबळजनक दावा
2
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
3
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
4
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
5
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
6
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
7
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
8
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
9
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
10
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
12
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
13
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
14
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
15
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
16
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
17
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
18
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
19
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
20
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

युद्धातील वीरांचा सन्मान करून होळी साजरी

By admin | Published: March 27, 2016 2:52 AM

१९६५ च्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या युद्धातील वीरांचा सन्मान करून तसेच कुठल्याही झाडाला न कापता सुका कचरा गोळा करून होळीचे दहन करण्यात आले.

गोपाल बोहरेंचा उपक्रम : सुका कचरा गोळा करून होळी दहननागपूर : १९६५ च्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या युद्धातील वीरांचा सन्मान करून तसेच कुठल्याही झाडाला न कापता सुका कचरा गोळा करून होळीचे दहन करण्यात आले. अशाप्रकारची आगळीवेगळी होळी मागील नऊ वर्षांपासून अत्रे लेआऊट येथील एनआयटी कॉलनीत नगरसेवक गोपाल बोहरे यांच्यातर्फे साजरी करण्यात येत आहे. नगरसेवक गोपाल बोहरे यांनी होलिकापूजन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होलिका दहन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, अविनाश महालक्ष्मे यांच्या हस्ते डॉ. वसंत विनायक तत्त्ववादी, प्रकाश खरे, वसंत हरी दामले, प्रभाकर पुराणिक, कृष्णा विष्णू हाडके यांना शाल-श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. वसंत तत्त्ववादी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, १९६२ च्या युद्धात चीनकडून पराभूत झाल्यानंतर डॉक्टरांनी लष्करात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला दाद देत मी लष्करात रजपूत बटालियन्समध्ये डॉक्टर म्हणून रुजू झालो. १९६५ च्या युद्धात आमची बटालियन लाहोरपर्यंत पोहोचली होती. युद्ध जिंकल्यानंतर तब्बल सहा महिने भारतीय सेना पाकिस्तानात होती, त्यामुळे १९६६ सालची होळी पाकिस्तानात साजरी केल्याची आठवण त्यांनी सांगितली. प्रास्ताविक गोपाल बोहरे यांनी केले. प्रा. प्राची भेदे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रशांत बुजवणे, किरण देशमुख, अण्णा जातेगावकर, विजित आगलावे, राजकुमार टेकाडे, प्रणव बोहरे, दिशा पाटील, हिरण्य भागवत, आशिष कर्णेवार, चिन्मयी कावळे, आर्या टेकाडे, मयुरी भालेराव, प्राची भेदे आणि संपूर्ण साहस गणेश मंडळाने परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)