लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नात्यांचा बहर मोसमागणिक खुलत जातो आणि श्रावणात तर नात्यांना अधिकच बहर येतो. मैत्रीच्या नात्याला तसे मोसमाशी कसलेच घेणे-देणे नसले तरीसुद्धा सर्वांगसुंदर अशा मोसमात जीवाभावाच्या सख्यांसोबत वेळ घालविण्याचा आनंद वेगळाच भासतो. अशाच निसर्गरम्य बहरलेल्या वातावरणात रविवारी आबालवृद्धांनी ‘मैत्री दिन’ साजरा केला; सोबतच अधामधात बरसलेल्या श्रावणसरींनी या भेटींना सौंदर्याची झालर चढवली.मैत्री दिनाच्या पर्वाला रविवारी फुटाळा, अंबाझरीसह शहरातील आणि शहराबाहेरील सर्व पर्यटन स्थळे युवक-युवती आणि कुटुंबीयांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाली होती. युवावर्गाचे एकत्रित येण्याचे प्रमुख स्थळ असलेले फुटाळा तलाव चौपाटी तर एखादी जत्रा भरावी तशी दिसत होती. सर्वत्र मैत्री पर्वाचा उत्साह आणि चैतन्य जल्लोषात ओसंडून वाहत असल्याचे भासत होते. मात्र, हा जल्लोष इतका शिगेला पोहोचला होता की सर्रास वाहतुकीचे नियम मोडले जात असल्याचे स्पष्ट होत होते. एवढेच नव्हे तर पोलिससुद्धा नियमाला वाऱ्यावर सोडत सुसाट गाडी हाकत असल्याचे दिसून येत होते. ज्यासाठी पोलीस चौकाचौकात उभे असतात, ते नियम स्वत:च मोडत होते. चौकाचौकात वाहकाने हेल्मेट घातले नाही तर लगेच त्याला अडवून चालान फाडणारे पोलीस स्वत: मात्र विना हेल्मेट गाडी दौडवत होते. पोलिसच विना हेल्मेटचे म्हटल्यावर युवावर्गाला आयतीच संधी सापडल्यासारखी असल्याने, सुसाट गाड्यांचा वेग वाढवत विना हेल्मेट गाड्या हाकत होते; शिवाय एका दुचाकीवर तिघे तर कुठे चौघे जण बसून फुटाळ्यावर येत असल्याचे दिसत होते. मात्र, या सगळ्यांकडे स्वत:च सज्ज नसणाºया पोलिसांचे लक्ष दिसत नव्हते. अशा तºहेने कायदा ज्यांच्यासाठी आहे ते आणि जे लोक कायद्याची विधिवत अंमलबजावणी व्हावी असे सुरक्षा रक्षक स्वत:च मैत्री दिनाला जरा मवाळ झाल्याचे दिसून येत होते. सर्वत्र टिंगलटवाळीचा खेळ सुरू होता. मैत्री दिनाला सुरक्षा रक्षकांनी दाखविलेली मैत्रीभावना कुणाच्या जीवावर बेतू शकत होती, याचे कोणतेच सोयरसुतक त्यांना नव्हते.मैत्री दिनाच्या पर्वाला रविवारी फुटाळा, अंबाझरीसह शहरातील आणि शहराबाहेरील सर्व पर्यटन स्थळे युवक-युवती आणि कुटुंबीयांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाली होती. युवावर्गाचे एकत्रित येण्याचे प्रमुख स्थळ असलेले फुटाळा तलाव चौपाटी तर एखादी जत्रा भरावी तशी दिसत होती. सर्वत्र मैत्री पर्वाचा उत्साह आणि चैतन्य जल्लोषात ओसंडून वाहत असल्याचे भासत होते. मात्र, हा जल्लोष इतका शिगेला पोहोचला होता की सर्रास वाहतुकीचे नियम मोडले जात असल्याचे स्पष्ट होत होते. एवढेच नव्हे तर पोलिससुद्धा नियमाला वाºयावर सोडत सुसाट गाडी हाकत असल्याचे दिसून येत होते. ज्यासाठी पोलीस चौकाचौकात उभे असतात, ते नियम स्वत:च मोडत होते. चौकाचौकात वाहकाने हेल्मेट घातले नाही तर लगेच त्याला अडवून चालान फाडणारे पोलीस स्वत: मात्र विना हेल्मेट गाडी दौडवत होते. पोलिसच विना हेल्मेटचे म्हटल्यावर युवावर्गाला आयतीच संधी सापडल्यासारखी असल्याने, सुसाट गाड्यांचा वेग वाढवत विना हेल्मेट गाड्या हाकत होते; शिवाय एका दुचाकीवर तिघे तर कुठे चौघे जण बसून फुटाळ्यावर येत असल्याचे दिसत होते. मात्र, या सगळ्यांकडे स्वत:च सज्ज नसणाºया पोलिसांचे लक्ष दिसत नव्हते. अशा तºहेने कायदा ज्यांच्यासाठी आहे ते आणि जे लोक कायद्याची विधिवत अंमलबजावणी व्हावी असे सुरक्षा रक्षक स्वत:च मैत्री दिनाला जरा मवाळ झाल्याचे दिसून येत होते. सर्वत्र टिंगलटवाळीचा खेळ सुरू होता. मैत्री दिनाला सुरक्षा रक्षकांनी दाखविलेली मैत्रीभावना कुणाच्या जीवावर बेतू शकत होती, याचे कोणतेच सोयरसुतक त्यांना नव्हते.रस्ते वाहतूक नियम कायद्याला बगल नुकताच संसदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतुकीच्या नियमासंदर्भात अधिक कठोर नियम असणारा कायदा संमत करवून घेतला. असे असतानाही शहरातील पोलिसांकडून मात्र वाहतुकीसंदर्भात अत्यंत मवाळ धोरण अवलंबिले जात असल्याचे स्पष्ट झाले. कदाचित मैत्री दिनाची भेट म्हणूनच की काय... पोलिसांकडून कायदा तोडणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात होते.
उपराजधानीतील तरुणाईचे श्रावणसरीत मैत्रीचे धम्माल ‘सेलिब्रेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 10:38 AM
नात्यांचा बहर मोसमागणिक खुलत जातो आणि श्रावणात तर नात्यांना अधिकच बहर येतो. मैत्रीच्या नात्याला तसे मोसमाशी कसलेच घेणे-देणे नसले तरीसुद्धा सर्वांगसुंदर अशा मोसमात जीवाभावाच्या सख्यांसोबत वेळ घालविण्याचा आनंद वेगळाच भासतो.
ठळक मुद्दे‘फ्रेण्डशिप डे’निमित्त चैतन्य, उत्साह अन् जल्लोषतरुणाईच्या गर्दीने फुटाळा, अंबाझरी ‘हाऊसफुल्ल’