शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

महावितरणला केंद्राने १० हजार कोटी द्यावे : नितीन राऊत यांची केंद्रीय ऊर्जामंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 12:34 AM

‘कोरोना’मुळे महावितरण गंभीर आर्थिक संकटात सापडल्याने केंद्र शासनाने तातडीने १० हजार कोटी रुपयांची मदत करावी, अशी मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केंद्रीय ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देआर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मागितला निधी

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : ‘कोरोना’मुळे महावितरण गंभीर आर्थिक संकटात सापडल्याने केंद्र शासनाने तातडीने १० हजार कोटी रुपयांची मदत करावी, अशी मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केंद्रीय ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के.सिंह यांना पत्रदेखील लिहिले आहे. दोन दिवस ऊर्जा विभागातील अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर केंद्राकडून अनुदानाच्या रूपात मदत मागण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.राज्यात गेल्या तीन महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे महावितरणला फार मोठ्या व अभूतपूर्व आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. या काळात राज्यातील बहुतांश उद्योगधंदे व व्यवसाय बंद राहिल्यामुळे त्यातून मिळणारा महसूल ठप्प झाला आहे. शिवाय शेतीपंपांना व घरगुती ग्राहकांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिल्याने प्रचंड आर्थिक तूट निर्माण झाली आहे. एप्रिल आणि मेमध्ये महसूल वसुली जवळपास थांबली. त्यात वीज खरेदी खर्च (प्रामुख्याने स्थिर), कर्मचाऱ्यांचे पगार, कराचे उत्तरदायित्व कमी झाले नाही. याशिवाय ग्राहकांना वीज बिल अदा करण्यासाठी मुदतवाढ दिल्याने दैनंदिन खर्च भागविणेसुद्धा अशक्य झाले असल्याचे नितीन राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.सध्या दरमहा महावितरणला कर्जाची परतफेड आणि त्यावरील व्याजापोटी सरासरी ९०० कोटी रुपये द्यावे लागतात. ‘कोरोना’च्या संकटामुळे घेतलेल्या अतिरिक्त कर्जाचा भार महावितरणवर वाढल्यास आर्थिक परिस्थिती आणखीच बिकट होऊ शकते, असे नितीन राऊत यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतmahavitaranमहावितरणCentral Governmentकेंद्र सरकारfundsनिधी