केंद्र सरकार RSSच्या रिमोटवर; संघानेच महागाई कमी करण्यासाठी हस्तक्षेप करावा, भुपेश बघेलांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 05:00 PM2021-07-14T17:00:31+5:302021-07-14T17:03:10+5:30

‘बहुत हुई महंगाई की मार’, असा नारा देत मोदी सरकार सत्तेत आले. पण आता महागाई एवढी वाढली आहे की ‘गद्दी छोडो मोदी सरकार’ असे जनता म्हणू लागली आहे.

Central Government on the remote of RSS; The RSS should intervene to reduce inflation, says Bhupesh Baghela | केंद्र सरकार RSSच्या रिमोटवर; संघानेच महागाई कमी करण्यासाठी हस्तक्षेप करावा, भुपेश बघेलांचा टोला 

केंद्र सरकार RSSच्या रिमोटवर; संघानेच महागाई कमी करण्यासाठी हस्तक्षेप करावा, भुपेश बघेलांचा टोला 

Next


नागपूर - महागाईमुळे देशातील जनता त्रस्त आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रिमोटवर चालते. यामुळे आता संघानेच महागाई कमी करण्यासाठी पुढाकार घेत हस्तक्षेप करावा व केंद्राला सूचना करावी. यासाठीच आपण नागपुरात येऊन ही मागणी करीत आहोत. माझा आवाज संघाच्या कानापर्यंत पोहचेल, अशी अपेक्षा आहे, असा टोला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghela) यांनी बुधवारी नागपुरात पत्रकार परिषदेत लगावला. (Central Government on the remote of RSS; RSS should intervene to reduce inflation, says Bhupesh Baghela)

अ.भा. काँग्रेस समितीतर्फे महागाईविरोधात देशभरात जनजागरण केले जात आहे. याअंतर्गत भूपेश बघेल यांनी नागपुरात येत केंद्र सरकारवर निशाणा साधला. बघेल म्हणाले, मोदी सरकारने गेली सात वर्षे हिंदू- मुस्लीम, मंदिर- मशीद, अशा भावनिक मुद्यांवर घालवले. जनहिताच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच महागाईने उच्चांक गाठला आहे. रिझर्व्ह बँकेने महागाईचा दर २ ते ६ टक्क्यांपर्यंत जाईल, अशी शक्यता वर्तवली होती. मात्र, त्या पलिकडे महागाई गेली. पेट्रोल २६ टक्क्यांनी तर डिझेल ४२ टक्क्यांनी वाढले.

‘बहुत हुई महंगाई की मार’, असा नारा देत मोदी सरकार सत्तेत आले. पण आता महागाई एवढी वाढली आहे की ‘गद्दी छोडो मोदी सरकार’ असे जनता म्हणू लागली आहे. तत्पूर्वी विमानतळावर काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार आदींनी विमानतळावर बघेल यांचे स्वागत केले.

केंद्रात सत्ता आल्यास पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत
केंद्रात काँग्रेसची सत्ता आली, तर पेट्रोल- डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निश्चितपणे विचार केला जाईल, असे भूपेश बघेल यांनी आश्वस्त केले. मोदी सरकारने इतर उत्पादनांवर चुकीच्या पद्धतीने जीसीएसटी आकारल्याचा आरोपही त्यांनी केला.

तिसरे अपत्य कायद्याची छत्तीसगडमध्ये गरज नाही
तिसरे अपत्य असणाऱ्या कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, हा योगी आदित्यनाथ सरकारने घेतलेला निर्णय उत्तर प्रदेशच्या निवडणुकांवर डोळा ठेवून घेतलेला आहे. ज्यांना दोनच अपत्य आहे, त्या सर्वांना योगी सरकार नोकरी देणार आहे का? असा सवाल करीत या कायद्याची छत्तीसगडमध्ये गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- बघेल म्हणाले, भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात ईडी, सीबीआय व आयटी या विभागांमार्फत धाडी घातल्या जातात. या तीनही एजंसी भाजपच्या शाखा म्हणून काम करीत आहेत.

ज्योतिरादित्य शिंदेंवर निशाणा -
एअर इंडियाचा लोगो महाराजा आहे. आता हा महाराजा ज्योतिरादित्य शिंदे यांना म्हणत आहे, ‘महाराज आईये हम दोनो बिकाऊ है.’
 

Web Title: Central Government on the remote of RSS; The RSS should intervene to reduce inflation, says Bhupesh Baghela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.