शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

केंद्र सरकार RSSच्या रिमोटवर; संघानेच महागाई कमी करण्यासाठी हस्तक्षेप करावा, भुपेश बघेलांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 5:00 PM

‘बहुत हुई महंगाई की मार’, असा नारा देत मोदी सरकार सत्तेत आले. पण आता महागाई एवढी वाढली आहे की ‘गद्दी छोडो मोदी सरकार’ असे जनता म्हणू लागली आहे.

नागपूर - महागाईमुळे देशातील जनता त्रस्त आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रिमोटवर चालते. यामुळे आता संघानेच महागाई कमी करण्यासाठी पुढाकार घेत हस्तक्षेप करावा व केंद्राला सूचना करावी. यासाठीच आपण नागपुरात येऊन ही मागणी करीत आहोत. माझा आवाज संघाच्या कानापर्यंत पोहचेल, अशी अपेक्षा आहे, असा टोला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghela) यांनी बुधवारी नागपुरात पत्रकार परिषदेत लगावला. (Central Government on the remote of RSS; RSS should intervene to reduce inflation, says Bhupesh Baghela)

अ.भा. काँग्रेस समितीतर्फे महागाईविरोधात देशभरात जनजागरण केले जात आहे. याअंतर्गत भूपेश बघेल यांनी नागपुरात येत केंद्र सरकारवर निशाणा साधला. बघेल म्हणाले, मोदी सरकारने गेली सात वर्षे हिंदू- मुस्लीम, मंदिर- मशीद, अशा भावनिक मुद्यांवर घालवले. जनहिताच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच महागाईने उच्चांक गाठला आहे. रिझर्व्ह बँकेने महागाईचा दर २ ते ६ टक्क्यांपर्यंत जाईल, अशी शक्यता वर्तवली होती. मात्र, त्या पलिकडे महागाई गेली. पेट्रोल २६ टक्क्यांनी तर डिझेल ४२ टक्क्यांनी वाढले.

‘बहुत हुई महंगाई की मार’, असा नारा देत मोदी सरकार सत्तेत आले. पण आता महागाई एवढी वाढली आहे की ‘गद्दी छोडो मोदी सरकार’ असे जनता म्हणू लागली आहे. तत्पूर्वी विमानतळावर काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार आदींनी विमानतळावर बघेल यांचे स्वागत केले.

केंद्रात सत्ता आल्यास पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेतकेंद्रात काँग्रेसची सत्ता आली, तर पेट्रोल- डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निश्चितपणे विचार केला जाईल, असे भूपेश बघेल यांनी आश्वस्त केले. मोदी सरकारने इतर उत्पादनांवर चुकीच्या पद्धतीने जीसीएसटी आकारल्याचा आरोपही त्यांनी केला.

तिसरे अपत्य कायद्याची छत्तीसगडमध्ये गरज नाहीतिसरे अपत्य असणाऱ्या कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, हा योगी आदित्यनाथ सरकारने घेतलेला निर्णय उत्तर प्रदेशच्या निवडणुकांवर डोळा ठेवून घेतलेला आहे. ज्यांना दोनच अपत्य आहे, त्या सर्वांना योगी सरकार नोकरी देणार आहे का? असा सवाल करीत या कायद्याची छत्तीसगडमध्ये गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- बघेल म्हणाले, भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात ईडी, सीबीआय व आयटी या विभागांमार्फत धाडी घातल्या जातात. या तीनही एजंसी भाजपच्या शाखा म्हणून काम करीत आहेत.

ज्योतिरादित्य शिंदेंवर निशाणा -एअर इंडियाचा लोगो महाराजा आहे. आता हा महाराजा ज्योतिरादित्य शिंदे यांना म्हणत आहे, ‘महाराज आईये हम दोनो बिकाऊ है.’ 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे