लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक सोमवारी जिल्ह्यात दाखल होणार असून ते भिवापूर तालुक्यातील तीन गावांची पाहणी करणार असल्याची माहिती आहे.अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात १ लाख १९ हजार ३५५ शेतकऱ्यांचे ५४ हजार २०२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. यासाठी ४८ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव प्रशासनाकडून पाठविण्यात आला. शासनाकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पहिला टप्प्यात १३ कोटींचा निधी देण्यात आला आहे. राज्य शासनाने मदतीसाठी केंद्र सरकारकडे १० हजार कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे.त्यामुळे या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे चार पथक राज्यात दाखल झाले आहे. एक पथक विदर्भातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शुक्रवार २२ तारखेलाच दाखल झाले. हे पथक सोमवारी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास हे पथक नागपूर जिल्ह्यात दाखल होणार असून भिवापूर तालुक्यातील तीन गावांची पाहणी करतील. नक्षीवडद, सानेगाव व भिवापूर या तीन गावांना ते भेटी देतील, असे सांगितले जाते.
केंद्राचे पथक भिवापूर तालुक्यातील तीन गावांची करणार पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 10:49 PM
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक सोमवारी जिल्ह्यात दाखल होणार असून ते भिवापूर तालुक्यातील तीन गावांची पाहणी करणार असल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देसोमवारी देणार भेटी