आॅनलाईन लोकमतनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विविध विभाग तसेच कार्यालयांमध्ये ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविण्यात आले आहेत. मात्र या ‘सीसीटीव्ही’वर ‘वॉच’ होतोच, असे नाही. हीच बाब लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने ‘सीसीटीव्ही’साठी केंद्रीभूत प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.नागपूर विद्यापीठाचा मुख्य प्रशासकीय परिसर, परीक्षा विभाग तसेच कॅम्पसमधील काही विभागांमध्ये ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावण्यात आले आहेत. विभाग व कार्यालयांमध्ये सुरक्षा राहावी यासाठी आणखी ‘सीसीटीव्ही’ लावण्याचा प्रशासनाचा विचार आहे, सोबतच सगळीकडे केंद्रीभूत प्रणाली लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या माहिती व तंत्रज्ञान मंडळाची मान्यतादेखील घेण्यात आली आहे, असे डॉ. येवले यांनी सांगितले.
नागपूर विद्यापीठात ‘सीसीटीव्ही’साठी केंद्रीभूत प्रणाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:02 AM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विविध विभाग तसेच कार्यालयांमध्ये ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविण्यात आले आहेत. मात्र या ‘सीसीटीव्ही’वर ‘वॉच’ होतोच, असे नाही. हीच बाब लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने ‘सीसीटीव्ही’साठी केंद्रीभूत प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
ठळक मुद्देआणखी ‘सीसीटीव्ही’ लावणार