शहरं
Join us  
Trending Stories
1
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
2
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
3
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
4
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
5
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
6
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
7
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
8
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
9
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
10
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
11
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
12
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

सीईओंची विभाग प्रमुखांना कारवाईची तंबी; अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश

By गणेश हुड | Published: July 11, 2023 7:03 PM

Nagpur News विभागप्रमुखच आदेशाचे पालन करीत नसल्याने मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी बदली झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करा, अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्याची तंबी दिली आहे. 

गणेश हूड नागपूर :  मे महिन्यात जिल्हा परिषदेत बदल्यांची प्रक्रिया पार पडली. सर्व विभागातील १५८ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यांना ३१ मे पर्यंत बदलीच्या ठिकाणी रुजू व्हायचे होते. मात्र विभागप्रमुखांनी आपल्या मर्जीतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना  अद्यापही कार्यमुक्त केलेले नाही. विभागप्रमुखच आदेशाचे पालन करीत नसल्याने मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी बदली झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करा, अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्याची तंबी दिली आहे. 

      जिल्हा परिषदेतील  १५८  अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती करण्यात आल्या. यात  आरोग्य विभागातील ४१, शिक्षण १५, सामान्य प्रशासन विभाग  ४०, वित्त  ३, लघुपाटबंधारे २, ग्रामीण पाणीपुरवठा  २, बांधकाम -६, पशसंवर्धन ८, महिला व बाल कल्याण ६, कृषि  २ आणि  पंचायत विभागातील  ३३ कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शर्मा यांच्या आदेशाने विभाग प्रमुखांत खळबळ उडाली आहे.,

टॅग्स :zpजिल्हा परिषद