- लक्ष्मण चिमले यांच्या ‘आयुष्यरेखा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाचन साखळी हा कौतुकास्पद उपक्रम असून, यातून दर्जेदार लेखकांची साखळी तयार व्हावी आणि बालकांसाठी उत्तमोत्तम साहित्य तयार व्हावे, अशी भावना प्रसिद्ध बाल साहित्यिक राजीव तांबे यांनी व्यक्त केली.
‘वाचन साखळी’ या ऑनलाइन उपक्रमाची वर्षपूर्ती व लक्ष्मण चिमले यांच्या ‘आयुष्यरेखा’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आभासी माध्यमाद्वारे पार पडला. त्यावेळी अध्यक्षस्थानाहून तांबे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राची साठे, विठ्ठल भुसारे, डॉ. विशाल तायडे, हनुमंत चांदगुडे, नेहा भांडारकर, मोहन शिरसाट, प्राणजित बोरसे उपस्थित होते. भुसारे यांनी ‘तुफानातील दिवे’ ही काव्यरचना गायन स्वरूपात सादर केली. यावेळी गणेश तांबे, योगेश आहेर, नीता खोत, दीपाली जोशी, गणेश गडदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रतिभा लोखंडे यांनी केले तर सूत्रसंचालन अनुजा चव्हाण व प्रतिभा टेमकर यांनी केले. आभार कचरू चांभारे यांनी मानले. यावेळी विक्रम अडसूळ, नारायण मंगलारम उपस्थित होते.
...............